Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा आदिवासी प्रकल्प विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटपात राज्यात ठरला अव्वल

team by team
February 13, 2022
in शैक्षणिक
0
तळोदा आदिवासी प्रकल्प विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटपात राज्यात ठरला अव्वल

तळोदा l प्रतिनिधी

अलिविहिर येथील शासकीय आश्रम शाळेत आदिवासी प्रकल्प मार्फत विविध दाखल्यांसाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी ६४५ विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले.दरम्यान तळोदा आदिवासी विकास प्रकल्पांने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवून राज्यात अव्वल ठरला आहे. तसेच प्रकल्पाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पुढील शैक्षणिक वर्षासाठी जातीचे व तत्सम दाखले आदिवासी विद्यार्थ्यांना लागत असतात.तथापि हे दाखले काढण्यासाठी विद्यार्थी व त्यांचा पालकांना कागद पत्रांची पूर्तता करताना मोठी दमछाक होते.यात त्यांचा वेळ व पैसा देखील खर्च होत असतो.तरीही काही वेळेस यंत्रणांच्या उदासीन धोरणामुळे वेळेवर मिळत नाही.ही पार्श्वभूमी लक्षात घेवून येथील आदिवासी विकास प्रकल्पाने आपल्या न्युक्लिअस बजेट मधून आपल्या अखत्यारीत असलेल्या शासकीय आश्रम शाळामधील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले व आधार अपडेट्स करून देण्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे.त्यामुळे तळोदा तालुक्यातील आलिविहिर येथे शिबीर आयोजीत केले होते.या शिबिरात साधारण ६४५ विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले. हे दाखले प्रकल्प अधिकारी डॉ मैनाक घोष यांच्या उपस्थित देण्यात आले.या वेळी  प्रकल्प अधिकारी डॉ घोष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले शासनाने आदिवासी विकास प्रकल्प मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यासाठी भरीव निधी मंजूर केला आहे.त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यात येतील.त्यासाठी आता फिरफिर करावी लागणार नाही.शिवाय हे दाखले त्यांना पुढील शैक्षणिक कामासाठी देखील कामात येतील.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन सहायक प्रकल्प अधिकारी सुवर्णा सोलंकी यांनी केले होते. शिबिरास सहायक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे,अधीक्षक, मुख्याध्यापक,शिक्षक उपस्थित होते.शिबिर यशस्वीतेसाठी प्रांत कार्यालयातील नेट वर्क अभियंता वाल्मीक पाटील व संगणक संचालक यांनी परिश्रम घेतले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

कोंढावळ येथील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकूलच्या ड यादीतील 300 लाभार्थ्यांचे नावे अपात्र, अपात्र लाभार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा

Next Post

मजुर पुरविण्याचे आमिष दाखवत ६ लाख ३० हजाराची फसवणुक, तिघांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post
पपई व्यापाऱ्याने मामाचे मोहिदे परिसरातील शेतकऱ्यांना लावला ४६ लाखांचा चुना, व्यापाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

मजुर पुरविण्याचे आमिष दाखवत ६ लाख ३० हजाराची फसवणुक, तिघांविरूध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add