Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील मानवतस्करी रोखण्याकरीता उपाययोजना करा, नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे महिला आयोग प्रदेशाध्यक्षांना निवेदन

team by team
February 12, 2022
in राजकीय
0
जिल्ह्यातील मानवतस्करी रोखण्याकरीता उपाययोजना करा, नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे महिला आयोग प्रदेशाध्यक्षांना निवेदन

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील मानव तस्करी रोखण्याकरीता आपल्या स्तरावरुन उपाययोजनांसाठी आदेश व्हावेत, अशी मागणी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नगरपरिषद/नगरपंचायत कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन राज्य महिला आरोगाच्या प्रदेशाध्यक्षा तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना देण्यात आले.
नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नगरपरिषद/नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड.प्रकाश भोई यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या अभावामुळे ग्रामीण भागातून आदिवासी व कष्टकरी महिलांचे स्थलांतर होत असते. त्यात गुजरात, मध्यप्रदेश, नाशिक, पुणे, मुंबई अशा ठिकाणी प्रवास करत स्थलांतर होत असते. बर्‍याचदा यात महिलांचा तसेच गरोदर महिला व लहान बालकांचा समावेश असतो. त्यांना स्थलांतरीत प्रदेशात योग्य सुविधा नसतात. तसेच त्यांचे लैंगिक शोषण होत असते. पुरेसा कामाचा मोबदला मिळत नसतो. तसेच त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतात. लहान बालकांचेही पालन-पोषण योग्यरित्या होत नाही. त्याप्रमाणे कुपोषणाचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत सदर महिलांचे तस्करीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातून शेकडो महिला कधीच परत आलेल्या नाहीत. किंवा त्यांचा काहीतरी घातपात झाल्याचे त्यांच्या परिवाराकडून सांगितले जाते. अशा गंभीर समस्येची कोठेही मोजदात किंवा गणना केलेली दिसून येत नाही. किंवा त्याकडे महाराष्ट्र शासनाचे व महिला आयोगालाही त्याबद्दल अवगत केले जात नाही. अशा महिलांना व मजुरांना न्याय मिळावा म्हणून प्रत्येक जिल्ह्यात अधिकृत नोंदणी असणार्‍या संस्थांना व व्यक्तींनाच मजुर नेण्याचे अधिकार किंवा परवाना देण्यात यावेत. किती मजुर आले व गेले? याचा वार्षिक तपशिलवार अहवाल वेळावेळी शासनाने व महिला आयोगाने तपासला पाहीजे. कोणीतरी अज्ञात व्यक्ती महिलांना, पुरुषांना मजुर म्हणून घेवून जाते. त्यामुळे गुन्हेगारी स्वरुपाचे मोठे षडयंत्र यात असल्यावरही प्रशासनाला काहीच करता येत नाही. तरी नोंदणीकृत संस्थांकडे मजुरांची संख्या, पत्ता, वय, त्यांचे आरोग्याचे प्रमाणपत्र तसेच कामाचा कालावधी व कुठल्या कंपनीत, कारखान्यात कामाला जात आहेत तेथील पत्ता व संबंधित पत्र असणे बंधनकारक असल्याशिवाय मजुरांची ने-आण करता येणार नाही. यासाठी उपाययोजना कराव्यात. सदर मजुरांना (महिला मजुरांना) लैंगिक शोषण झाल्यास, आर्थिक शोषण झाल्यास दाद मागता येईल व शासनालाही योग्य ती कारवाई करण्यास सोपे जाईल. सदर नोंदणीकृत संस्था व व्यक्ती यांना जबाबदारीने सदर मजुरांना सुखरुपपणे पुन्हा आणण्याची सक्त असावी. ज्यामुळे मजुरांची तस्करी, गैरवापर, लैंगिक, आर्थिक शोषण, मानवाधिकारांचे अवमूल्यन होणार नाही, यासाठी आळा बसेल. तरी आमच्या निवेदनातील मागणीची गांभीर्यपूर्ण विचार करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नगरपरिषद/नगरपंचायत कर्मचारी संघटना, नंदुरबारतर्फे करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बेडकीपाडा चेकपोस्टवर वाहनधारकांची होतेय लूट, भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यासाठी व्यावसायिकांनी दिला आंदोलनाचा इशारा

Next Post

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखा : हिंदु जनजागृती समिती

Next Post
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखा : हिंदु जनजागृती समिती

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखा : हिंदु जनजागृती समिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add