नंदुरबार | प्रतिनिधी
येथील नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नंदुरबार- नवापूर विधानसभा मतदार संघ या दोन विभागातील नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.
नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नंदुरबार-नवापूर विधानसभा मतदार संघ क्षेत्रातील नंदुरबार व नवापूर या दोन विभागातील कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व पक्ष निरीक्षक विनय भोईटे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी यांनी नंदुरबार व नवापूर विभागातील कार्यकारिणी गठीत केली आहे. नंदुरबार येथे मनसेच्या वतीने नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, रस्ते आस्थापना विभागाचे धुळे-नंदुरबार संपर्कप्रमुख अतुल पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. यात नंदुरबार जिल्हा सचिवपदी पवनकुमार गवळे, नंदुरबार शहर उपाध्यक्षपदी राम ठक्कर, उपशहराध्यक्षपदी बबन पाडवी, नंदुरबार तालुकाध्यक्षपदी राकेश माळी, उपतालुका अध्यक्षपदी गणेश देसले, उपतालुकाध्यक्ष भाऊसाहेब गोसावी, नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी सुनील कोकणी, नंदुरबार तालुका प्रसिध्दीप्रमुखपदी कल्पेश माळी, कोपर्ली गटाची अध्यक्षपदी उमेश ठेलारी, कोपर्ली गण अध्यक्षपदी सतिवान भील, खोंडामळी गट अध्यक्षपदी पवन माळी, खोंडामळी गण अध्यक्षपदी अशोक माळी, कोठली गट अध्यक्षपदी निलेश कोकणी, कोठली गण अध्यक्षपदी पंकज गायकवाड, धानोरा गट अध्यक्षपदी श्याम माळी, धानोरा गण अध्यक्षपदी परेश माळी, शनिमांडळ गट अध्यक्षपदी रायसिंग ठाकरे, नवापूर विधानसभा क्षेत्रातील उपजिल्हाध्यक्षपदी डॉ.सुहास थोरात, नवापूर शहराध्यक्षपदी रफिक शेख, नवापूर उपशहर अध्यक्षपदी आशिष जगदाळे, नवापूर शहर सचिव वासुदेव सोनवणे, नवापूर तालुकाध्यक्ष अरविंद वळवी, नवापूर उपतालुका अध्यक्षपदी वंदेश वसावे, नवापूर उपतालुका अध्यक्षपदी जुबेर शेख यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कोरोना नियमांचे पालन करून नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम झाला.










