नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील बिलगाव ते सावऱ्या दिगर या दरम्यान उदय नदीवर असलेला पूल १० वर्षे काम अर्धवट स्थगित काम येत्या १० दिवसात चालू करण्यात यावे. अन्यथा सर्व १२ हजार गावकरी तहसील कार्यलयास घेराव घालून जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत बेमुदत आंदोलन करण्यात येईल अशा इशाऱ्याचे निवेदन आदिवासी टायगर सेना व गावकऱ्यांनी अक्राणी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे.


या निवेदनात म्हटले आहे की, धडगाव तालुक्यातील बिलगाव ते सावऱ्या दिगर या दरम्यान उदय नदीवर असलेला पूल १० वर्षे काम अर्धवट अवस्थेत तसाच आहे.नर्मदा प्राधिकरण तसेच भिंगारे समिती च्या अहवाल अनुसार सावऱ्या दिगर,भमाने,खापरमाल,उडद्या,भाबरी,मांजनी,कुंड्या या ७ गावातील तसेच या ठिकाणी असनारे पाडे यातील जवळपास १२ हजार लोकांचा विचार करून उदय नदीवर बिलगाव ते सावऱ्या दिगर दरम्यान सन २०१२ साली पूल बांधकाम चालू करण्यात आले ,पण आज सन २०२२ साल उजाडले तरी सुद्धा पुलाचे काम अर्धवट अवस्थेत पडून आहे.या दरम्यान अनेक वेळा निवेदन दिले गेले, वर्तमानपत्रात याब्बतीत बातमी आली तरी सुद्धा कोणीच दखल घेतली नाही.या साठीचतहसिलदार यांच्या मार्फत आमची कळकळ मुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य यांच्या पर्यंत पोहचवत आहोत. सातपुडा डोंगर रांगेतील नर्मदा तीरावर वसलेली हि गावे भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली तरी सुद्धा जाणूनबुजून प्रशासन या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे.एवढा मोठा विषय असून सुद्धा याकडे ना नर्मदा प्राधिकरण लक्ष देत आहे.ना जिल्हाधिकारी,नंदुरबार लक्ष देत आहे.ना सार्वजनीक बांधकाम विभाग नंदुरबार लक्ष देत आहे. या सर्व विभागांना या १२ हजार आदिवासींची काहीही पडलेली नाही आहे असे दिसून येत आहे.आम्ही सातपुडा मधील आदिवासी बांधवाना किड्या मुंग्या प्रमाणे प्रशासनकडून वागणूक मिळत आहे ,जर असाच पूल जर का शहराच्या ठिकाणी असता तर तो तत्काळ १ वर्षात पूर्ण झाला असता.तरी या लक्षवेधक निवेदनामार्फत आम्ही सर्व १२ हजार गावकरी १० वर्षे वाट पाहून थकलेले आहोत.येत्या १० दिवसात सदर पुलाचे काम चालू करण्यात यावे. अन्यथा सर्व १२ हजार गावकरी तहसील कार्यलयास घेराव घालून जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत बेमुदत आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.तसेच कायदा व सुव्यवस्था चे प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासानाची राहील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रविद्र पाडवी, आदिवासी टायगर सेनेचे राज्याध्यक्ष प्रविण पावरा,सामाजिक कार्यकर्ते युवराज खर्डे,प्रमोद पावरा,अमित पावरा,महेंद्र पावरा,रामसिंग पावरा,दिपक पावरा यांच्यासह गावकऱ्यांनी दिला आहे.









