Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सावखेडा गावाजवळ दुचाकीला टाटासुमोची धडक, अपघातात दोघे ठार

team by team
February 10, 2022
in क्राईम
0
सावखेडा गावाजवळ दुचाकीला टाटासुमोची धडक, अपघातात दोघे ठार

शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मंदाणे रस्त्यावरील सावखेडा गावाजवळील वळणावर महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या दुचाकीस्वारास समोरून येणाऱ्या एका टाटा सुमो गाडीने जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहादा मंदाणे राज्य महामार्गावर शहाद्याकडून मध्यप्रदेशात दोन जण दुचाकी वाहनाने जात असताना सावखेडा गावाच्या पहिल्या वळणावर समोरून येणाऱ्या एका टाटा सुमो गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात कुमारिया डेडा वसावा (वय-48 पोलीस पाटील), मुआरी दगड्या पटले (वय-38) दोन्ही रा.खपाडा ता. वरला, जिल्हा बडवानी (मध्यप्रदेश)
या दोघांचा जागीच मृत्यू झाला.अपघात घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. त्यावेळी असलोद पोलिसठाणे दुरक्षेत्राचे हवालदार दीपक परदेशी,अमृत पाटील यांनीही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले.मयत हे स्वतःचे दुचाकी वाहनासह अन्य एका बोलेरो गाडीने कुटुंबीयांसह देवमोगरा येथील मातेच्या दर्शनासाठी गेले होते. तेथून गुरुवार दि. 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मंदाणे  मार्गाने मध्यप्रदेशात सेंधवाकडे जात असताना मयत हे दोघे जण दुचाकीवर होते. त्यांच्या पुढे कुटुंबीय असलेले बोलोरो गाडी जात होती त्याचवेळी समोरून येणाऱ्या एका सिल्व्हर रंगाच्या टाटा सुमो गाडीने जोरदार धडक दिली. घटनास्थळी अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता.मयत झालेल्या दोघांना डोक्यास, तोंडाला गंभीर जखमा झाल्या.मृतदेह शवविच्छेदनासाठी म्हसावद ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले. दोघांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या वाहन चालकाचा लवकरच शोध घेतला जाईल अशी माहिती शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी दिली आहे.रात्री उशिरा पर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात येत होती.

बातमी शेअर करा
Previous Post

बालविवाह होणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच व विवाहाची नोंद करणाऱ्यांचे पद रद्द होणार : रुपाली चाकणकर

Next Post

मुख्यमंत्र्यांना लक्षवेधक निवेदन सादर :१० दिवसात मागणी मान्य न झाल्यास १२ हजार गावकरी तहसील कार्यलयास घालतील घेराव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add