Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात सिम्युलेटर मशीन कार्यान्वीत,अनुत्तीर्ण अर्जदारांना प्रशिक्षण देण्यासाठी होतोय मशीनचा वापर

team by team
February 10, 2022
in राज्य
0
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात सिम्युलेटर मशीन कार्यान्वीत,अनुत्तीर्ण अर्जदारांना प्रशिक्षण देण्यासाठी होतोय मशीनचा वापर

नंदुरबार | प्रतिनिधी
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथे ड्रायव्हींग लायसन्स चाचणीसाठी येणार्‍या उमेदवारांना शास्त्रशुध्द पद्धतीने वाहन कसे चालवावे याचा अनुभव येण्यासाठी सिम्युलेटर मशीन बसविण्यात आले आहे .

राज्यातील सर्व प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात सिम्युलेटर मशीन शासनाद्वारे देण्यात आले असून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय , नंदुरबार येथे एक मशीन प्राप्त झाले आहे . व्हटॅक्स रिसर्च फाउंडेशन , तामिळनाडु या संस्थेने या मशीनची निर्मिती केली असून या मशीनची किंमत सुमारे ५.५ लक्ष रु . आहे . प्रत्यक्ष वाहन चालविण्याचा अनुभव येण्यासाठी या मशीनमध्ये स्टिअरींग व्हील , एल.सी.डी. स्क्रीन , गीअर बॉक्स , क्लच , ब्रेक , ऍक्सीलेटर , हॉर्न , वायपर , इंडिकेटर , इत्यादी सर्व यंत्रणा देण्यात आल्या आहेत . वाहनचालकाने सिम्युलेटर मशीनवर वाहन चालवितांना केलेल्या चुकांची नोंद संगणकाद्वारे घेतली जाते व मशीनवर सहा किलोमीटरचे ड्रायव्हींग पूर्ण झाले की त्या चुकांची यादी पहाण्यासाठी उपलब्ध होते . वाहनचालकाला प्रत्यक्ष रस्त्यावर वाहन चालविण्याचा अनुभव यावा यासाठी वेगमयदिचे फलक , सिग्नल यंत्रणा , नाईट ड्रायव्हींग , इत्यादी बाबींचा अंतर्भाव या मशीनमध्ये करण्यात आला आहे . उप प्रादेशिक परिवहन कार्यालय , नंदुरबार येथे दररोज सुमारे ६०-७० अर्जदार लायसन्स काढण्यासाठी येत असतात . यातील सुमारे ९ -१० अर्जदार चाचणीमध्ये अनुत्तीर्ण होतात अनुत्तीर्ण झालेल्या अर्जदारांना प्रशिक्षण देण्यासाठी या मशीनचा वापर करण्यात येत आहे अशी माहिती उप प्रादेशीक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

जनसुनावणीतुन पीडित महिलांना न्याय देण्याचा आयोगाचा प्रयत्न : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

Next Post

रोजगार आणि ग्राम समृद्धीसाठी एकवटले भगदरी मोजपाडा गावांतील नागरिक

Next Post
रोजगार आणि ग्राम समृद्धीसाठी एकवटले भगदरी मोजपाडा गावांतील नागरिक

रोजगार आणि ग्राम समृद्धीसाठी एकवटले भगदरी मोजपाडा गावांतील नागरिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add