तळोदा l प्रतिनिधी
एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष राजकुमार सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार होता परंतु 8 दिवसांची मुदत मागितल्याचे पत्र संघटनेला देण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर 10 रोजी निघणाऱ्या मोर्चाचा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे
एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष राजकुमार सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार होता परंतु निवासी जिल्हाधिकारी सदगिर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक झाली असून यात प्रशासनाने 8 दिवसांची मुदत मागितले असून याबाबत तोंडी आश्वासन दिले आहे. दि. 10 रोजी धडक मोर्चास जिल्हाभरातून अनेक संघटनानी पाठिंबा दर्शवला होता .जिल्ह्यातील संघटना देखील पूर्ण ताक्तिनिशी आंदोलनात सहभागी होणार होते तसे पत्र जिल्हाधिकारी मनिषा खत्री व संघटनेला देण्यात आले होते.तत्यामुळे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष राजकुमार सोनवणे दि10 फेब्रुवारी रोजी मोर्चात सहभागी होणार होते व एकलव्य संघटनेच्या प्रदेश कमिटी जिल्हा कमिटी तालुका कमिटी व शाखा प्रमुख व सर्व पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्ते नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 10 वाजता नवापूर चौफुली येथून मोर्चाला सुरुवात होणार होती परंतु जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडून तोंडी आश्वासन दिले असल्याने उपरोक्त तारखेस होणारे आंदोलन तूर्तास स्थगित करीत असून सदर आंदोलन स्थळी कोणीही कार्यकर्ते उपस्थित राहणार नाही असे आवाहन मोर्चाचे संयोजक प्रमुख ॲड.गणपत पाडवी, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष श्री रवी, गणेश सोनवणे शहराध्यक्ष कालू दादा, तळोदा तालुका अध्यक्ष दिनेश पाडवी यांनी पत्रकान्वये केली आहे.








