Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा राबविण्यात नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात तिसरा

team by team
February 9, 2022
in क्राईम
0
नंदुरबार सायबर सेलची धडाकेबाज कामगीरी , मागीलवर्षी १९ लाख परत मिळवून देण्यात यश,ऑनलाईन फसवणुक झाल्यास हे करा

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्याची ओळख महाराष्ट्रात आदिवासी जिल्हा किंवा अतिदुर्गम जिल्हा म्हणून आहे , असे असतांना देखील नंदुरबार जिल्ह्याने ‘ गुन्हे आणि गुन्हेगार भागोवा नेटवर्क यंत्रणा ‘ अर्थातच ( CCTNS ) प्रणाली राबविण्यात महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकावून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे . CCTNS प्रणालीची सुरुवात महाराष्ट्रात सन 2015 मध्ये झाली असून CCTNS प्रणालीत पोलीस ठाणे स्तरावर दैनंदिन होणाऱ्या प्रत्यक घडामोडींची ऑनलाईन नोंदी घेण्यात येत असते , त्यात प्रथम खबर अहवाल ( FIR ) , स्टेशन डायरी नोंदी , अटक आरोपींच्या नोंदी , तसेच पोलीस ठाण्यात हस्तलिखीत होणाऱ्या सर्व नोंदी ह्या आता CCTNS प्रणालीत संगणकाद्वारे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत असतात . प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी संबंधीत कर्मचाऱ्यांकडून CCTNS प्रणालीत दैनंदिन डाटा फिडींगचे काम करुन घेत असतात आणी त्यावर प्रत्यक्ष पर्यवेक्षण पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्याकडुन होत असते . गुन्हेगारांवर वचक ते सामाजिक बांधीलकी सोबत पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला तंत्रज्ञानाला देखील मागे पडू दिलेले नाही . महाराष्ट्रातील 36 जिल्हे व 11 पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्र शासनाचा सुरु असलेला CCTNS प्रणाली राबविण्यात नंदुरबार जिल्हा मागील 5 महिन्यांपासून राज्यात सतत तृतीय स्थानावर आहे . डिसेंबर 2021 मध्ये नंदुरबार जिल्हा CCTNS प्रणालीत महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे . नंदुरबार जिल्ह्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात इंटरनेटचा स्पीड , सुरळीत असा वीज पुरवठा व इतर अत्याधुनिक सुविधा असतांना देखील CCTNS प्रणाली राबविण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्र पोलीस दलात आपली एक नवी ओळख निर्माण केलेली आहे आणि याचे संपूर्ण श्रेय अर्थातच नंदुरबार जिल्हा पोलीसांना जाते . नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात CCTNS चे मुख्य सर्व्हर असुन त्याठिकाणी सहा . पोलीस निरीक्षक नयना देवरे व त्यांचे पथक असुन पोलीस ठाणे स्तरावर दैनंदिन ऑनलाईन फिडींगच्या कामावर ते देखरेख ठेवतात . तसेच पोलीस ठाण्याला येणारे तांत्रिक व इतर अडचणींबाबत ते पोलीस ठाण्याला जावून ते सोडवित असतात . नंदुरबार सारख्या अतिदुर्गम किंवा आदिवासी जिल्ह्यात CCTNS प्रणाली राबवुन ती यशस्वी करणे हे एकप्रकारे नंदुरबार जिल्हा पोलीस दलासाठी आवाहन होते , कारण नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव , मोलगी , अक्कलकुवा व इतर ग्रामीण भागात इंटरनेटच्या वेगाची मर्यादा नंदुरबार जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांपेक्षा कमी असते . त्यातच वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा अशा अनेक अडचणींवर मात करून पोलीस प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजाची दिलेल्या विहीत वेळेत व जास्तीत जास्त ऑनलाईन फिडींग करुन नंदुरबार जिल्हा CCTNS टीमने सन -2021 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तृतीय स्थान पटकावून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे . सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी. आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उपविभागीय पोलीस अधिकारी , नंदुरबार सचिन हिरे ,उपविभागीय पोलीस अधिकारी , शहादा श्रीकांत घुमरे , उपविभागीय पोलीस अधिकारी , अक्कलकुवा संभाजी सावंत , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक नयना देवरे , पोलीस नाईक राजेंद्र मोरे , पोलीस शिपाई सतिश गिते तसेच नंदुरबार जिल्ह्यातील CCTNS चे काम पाहणारे पोलीस अमंलदार यांचे पथकाने केलेली आहे व त्यांचे अभिनंदन केलेले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

जलजीवन मिशन अंतर्गत मांजरे गावात जलकुंभाचे भूमिपूजन, कालिका माता मंदिराचा सुशोभीकरणासाठी प्रयत्न करणार; जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयावर 10 रोजी निघणाऱ्या मोर्चाचा तूर्तास स्थगित

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयावर 10 रोजी निघणाऱ्या मोर्चाचा तूर्तास स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add