Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आयटकतर्फे विविध मागण्यासाठी दिं.14 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध कार्यालासमोर लाटणे मोर्चा

Mahesh Patil by Mahesh Patil
February 8, 2022
in राज्य
0
आयटकतर्फे विविध मागण्यासाठी दिं.14 पासून   जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध कार्यालासमोर लाटणे मोर्चा

तळोदा l प्रतिनिधी
आशा स्वयसेविका व गटप्रवर्तकांचे चार महिन्याचे थकीत मानधन तात्काळ मिळावे व इतर प्रश्न त्वरीत सुटावे यासाठी दि.१४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर जिल्हा परिषदां, जिल्हाधिकारी कार्यालये, पंचायत समिती कार्यालयासमोर लाटणे मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
या बाबत निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटना व महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या वतीने राज्यातील 68 हजार आशा व 4 हजार गट प्रवर्तक खालील प्रमाणे निवेदन करीत आहोत.महाराष्ट्रात शहरी व ग्रामिण भागात कोवीड १९ लसीकरणांतर्गत आशा स्वयसेविका व गटप्रवर्तकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत सक्तीने काम लावण्यात येत आहे. याबाबत कोणताही मोबदला आशा स्वयसेविका व गटप्रवर्तकांना दिला जात नाही. आशा स्वंयसेविकांची नेमणुक कामावर आधारीत मोबदला या तत्वानुसार करण्यात आलेली आहे. कोवीड १९ च्या कामासाठी केंद्र शासनाकडुन मिळणारा एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता ऑक्टोंबर २०२१ पासुन देण्याचे बंद करण्यात आला होता तो पुर्ववत देण्याचे आदेश केंद्र शासनाने दिलेले आहेत. सकाळ पासुन संध्याकाळपर्यंत कोवीड १९ च्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आशा स्वयेसेविकांना व गटप्रवर्तकांना त्यांची मुळ कामे करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नसल्यामुळे त्यांना दरमहा कोवीड काळात मिळत असलेल्या मोबदल्यापेक्षा सध्या खुप कमी मोबदला मिळत आहे. त्यामुळे त्यांचे न भरून निघणारे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांना मिळणारा तुटपुंजा मोबदलाही वेळेवर दरमहा मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाप्रती त्यांच्या भावना संतप्त होवुन आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मनामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे. याकडे आपण गांभिर्याने लक्ष देवुन आशा स्वयसेविका व गटप्रवर्तकांचे ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२१ व जानेवारी २०२२ या चार महिन्याचे थकीत मानधन त्वरीत देवुन येथुन पुढे दरमहा पाच तारखेपर्यंत मानधन देण्याची व्यवस्था करावी. अशी आमची प्रमुख मागणी आहे.
तिसऱ्या लाटेत आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक स्वत:ला झोकुन देवुन इमानेइतबारे काम करत आहेत.आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या कष्टावरच आरोग्य विभागाचे श्रेय टिकुन आहे. तेव्हा पहिल्या फळीत काम करणाऱ्या आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांचे खालील अत्यंत जिव्हाळयाचे व तातडीचे प्रश्न विनाविलंब सोडवावेत,
केंद्र शासनाच्या सुधारीत पत्रानुसार ऑक्टोंबर २०२१ पासुन कोवीड प्रोत्साहन भत्ता आशा स्वंयसेविकांना रु.१००० व गटप्रवर्तकांना रु.५०० देण्याचे आदेश दिले आहेत. तेव्हा ऑक्टोंबर २०२१ ते जानेवारी २०२२ या चार महिन्याचा प्रोत्साहन भत्ता त्वरीत देण्यात यावा व यापुढे दरमहा नियमितपणे आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना कोवीड प्रोत्साहन भत्ता देण्याची व्यवस्था करावी.
आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांचा नियमित मोबदला ऑक्टोंबर २०२१ पासुन थकीत आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी तो थकबाकीसह तात्काळ देण्यात यावा. १७ जुलै २०२० च्या शासन निर्णयानुसार राज्य निधीमधुन आशा स्वयंसेविकांना रु.२००० व गटप्रवर्तकांना रु.३००० मोबदल्यात वाढ केली आहे. तो मोबदला सप्टेंबर २०२१ पासुन देण्यात आला नाही. तेव्हा सदर मोबदला माहे सप्टेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ या महिन्याचा तात्काळ देवुन येथुन पुढे नियमितपणे दरमहा मोबदला अदा करण्यात यावा. दि. १ जुलै २०२० पासुन वाढविलेल्या मोबदल्यात कोणत्याही प्रकारची कपात न करता पुर्ण मोबदला देण्याचे आरोग्य मंत्री यांनी मान्य केले आहे. तेव्हा त्यात कसल्याही प्रकारची कपात करण्यात येवु नये.
दि. २३ जुन २०२१ रोजी मा. आरोग्य मंत्री यांच्यासोबत झालेल्या कृति समितीच्या बैठकीतील चर्चेनुसार, जुलै २०२१ पासुन आशा स्वंयसेविकांच्या मोबदल्या रु. १००० व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रु. १२०० दरमहा वाढ व कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असे पर्यंत रु.५०० दरमहा प्रोत्साहन भत्ता देण्याचे ठरले होते. तसेच जुलै २०२२ पासुन पुन्हा आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा रु.५०० वाढ करण्याचे ठरले होते. त्याअनुषंगाने राज्य शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाने दि.९ सप्टेंबर २०२१ रोजी शासन निर्णय निर्गमित केला असुन त्यातील मुददा क्र. ४ मा. आरोग्य मंत्री यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार नाही. तेव्हा त्यात वरील प्रमाणे सुधारणा करण्यात यावी. व सुधारीत आदेश विनाविलंब काढुन त्याची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी.दि. २३ जुन २०२१ रोजी मा. आरोग्य मंत्री यांनी सीएचओची तात्काळ नेमणुक करु, असे आश्वासन दिले होते. परंतु अदयाप सीएचओच्या रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आरोग्य वर्धिनी अंतर्गत जेथे सीएचओ ची नेमणुक केलेली नाही तेथे आशांना काम करण्यास सक्तीने भाग पाडले जाते. परंतु सीएचओ ची नेमणुक नसल्याने आशांना काम करुनही कामाचा मोबदला दिला जात नाही. त्यामुळे सीएचओच्या रिक्त जागा त्वरीत भराव्यात. ज्या ठिकाणी सीएचओची नेमणुक केलेली नाही, त्याठिकाणच्या आशांनी आत्तापर्यंत केलेल्या कामाचा थकीत मोबदला दरमहा रु. एक हजार याप्रमाणे त्वरीत देण्यात यावा. जोपर्यंत सीएचओची नेमणुक केली जात नाही, तोपर्यंत आरोग्य वर्धिनी अंतर्गत आशांच्या कामाचे रेकॉर्ड एमओ नी ठेवुन आशांनी केलेल्या कामाचा मोबदला रु एक हजार नियमितपणे देण्यात यावा. बहुतांश आशा स्वंयसेविका व गटप्रतर्वकांचा उदरनिर्वाह त्यांच्या मिळणाऱ्या मोबदल्यावरच अवलंबुन आहे. त्यांची उपासमारी होत आहे.दि. २३ जुन २०२१ रोजी मा. आरोग्य मंत्री यांच्यासोबत झालेल्या कृति समितीच्या बैठकीतील चर्चेनुसार, जुलै २०२१ पासुन आशा स्वयसेविकांच्या मोबदल्या रु. १००० व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रु.१२०० दरमहा वाढ व कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असे पर्यंत रु.५०० दरमहा प्रोत्साहन भत्ता देण्याचे ठरले होते. तसेच जुलै २०२२ पासुन पुन्हा आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा रु.५०० वाढ करण्याचे ठरले होते. त्याअनुषंगाने राज्य शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाने दि. ९ सप्टेंबर २०२१ रोजी शासन निर्णय क्रमांक एनएचएम-११२१/प्र.क्र.६८/२१/आरोग्य-७ निर्गमित केला असून त्यातील मुददा क्र.४ मा. आरोग्य मंत्री यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार नाही. तेव्हा त्यात वरील प्रमाणे सुधारणा करण्यात यावी.व सुधारीत आदेश विनाविलंब काढून त्याची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी.

दि. २३ जुन २०२१ रोजी मा. आरोग्य मंत्री यांनी सीएचओची तात्काळ नेमणुक करु, असे आश्वासन दिले होते. परंतु अदयाप सीएचओच्या रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आरोग्य वर्धिनी अंतर्गत जेथे सीएचओची नेमणुक केलेली नाही तेथे आशांना काम करण्यास सक्तीने भाग पाडले जाते. परंतु सीएचओ ची नेमणूक नसल्याने आशांना काम करुनही कामाचा मोबदला दिला जात नाही. त्यामुळे सीएचओच्या रिक्त जागा त्वरीत भराव्यात. ज्या ठिकाणी सीएचओची नेमणुक केलेली नाही, त्याठिकाणच्या आशांनी आत्तापर्यंत केलेल्या कामाचा थकीत मोबदला दरमहा रु. एक हजार याप्रमाणे त्वरीत देण्यात यावा. जोपर्यंत सीएचओची नेमणूक केली जात नाही, तोपर्यंत आरोग्य वर्धिनी अंतर्गत आशांच्या कामाचे रेकॉर्ड एमओ नी ठेवुन आशांनी केलेल्या कामाचा मोबदला रु. एक हजार नियमितपणे देण्यात यावा. बहुतांश आशा स्वयसेविका व गटप्रतर्वकांचा उदरनिर्वाह त्यांच्या मिळणाऱ्या मोबदल्यावरच अवलंबुन
असल्यामुळे त्यांना दरमहा व नियमित मोबदला महिन्याच्या पाच तारखेपर्यंत देण्यात यावा. वरील प्रश्न तात्काळ सोडवावेत, जिल्हा परिषद, महानगर पालिका नि आशाव गट प्रवर्तकना कोरोना कामाचा प्रोत्साहन द्यावा. भत्ता संदर्भात काढलेल्या पत्राची अंमलबजावणी व्हावी,
कोविड लसीकरण सत्र मोबदला आशा व गट प्रवर्तक ना द्यावा, केंद्र सरकारने 2016 पासून आशा व गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ केलेली नाही. त्वरित केंद्र सरकारने मानधन वाढ करावी.वरील मागण्या साठी राज्यभर तीव्र आंदोलन 14 फेब्रुवारी2022 रोजी करण्यात येणार आहे. त्वरित दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आयटकच्या वतीने देत आहोत.कॉम्रेड राजू देसले राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटना( आयटक) व निमंत्रक महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृति समिती यांनी निवेदनात दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव व कात्री येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते गॅस शेगडी वाटप

Next Post

श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबारतर्फे सूर्यनमस्कार शिबीरात 41 बालक सहभागी

Next Post
श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबारतर्फे सूर्यनमस्कार शिबीरात 41 बालक सहभागी

श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबारतर्फे सूर्यनमस्कार शिबीरात 41 बालक सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

October 21, 2025
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

October 21, 2025
चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group