तळोदा l ईश्वर मराठे
तळोदा तालुक्यातील मोड ते बोरद रस्त्यावर पाईप फारशी वर रस्त्यावर मोठे भगदाड पडल्याने तेथे चक्क वाहनधारकांना हे भगदाड दिसावे म्हणून काटे व झेंडा लावन्यात आले आहे.याबाबत मात्र संबधित विभागाचे सपशेल दुर्लक्ष दिसून येत आहे.
तळोदा तालुक्यातील मोड ते बोरद रस्त्यावरील मोड गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या पाईप मोरी अर्थात पाईप फारशीवर रस्त्यावर मोठे भगदाड पडले आहे.यामुळे मोटर सायकल व लहान चार चाकी वाहनांचे किरकोळ अपघात झाले आहेत. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. वाहनधारकांना हे भगदाड दिसावे म्हणून काटे व भगवा झेंडा लावला आहे. हा रस्ता नवीन केला त्यावेळी जीर्ण पाईप फारशी कडे दूर्लक्ष करीत तसेच नवीन रस्त्या तयार केला आहे. तरी संबंधित विभागाने घालावे हा खड्डा त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे.