नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील वर्षा विजय पाटील सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत गणित विषयात उत्तीर्ण झाले आहेत.
वर्षा पाटील यांनी गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्यांनी कमी वयात सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षणासंदर्भात आवड छंद जोपासत आहेत. त्या तासिका तत्वावर जी.टी.पाटील महाविद्यालयात काम करत असून सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत पाटील यांच्या सून तर क्रीडाशिक्षक डॉ.मयुर ठाकरे यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मा.आ.चंद्रकांतजी रघुवंशी, उपाध्यक्ष मनोज रघुवंशी यांनी अभिनंदन केले आहे. वर्षा पाटील यांना जी.टी.पाटील महाविद्यालयाचे गणित विभाग प्रमुख प्रा.चौधरी सर, प्रा.संगीता पिंपरे, प्रा.केशव परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले.