Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीसदलातर्फे २३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान विनामास्क प्रकरणी दोन हजार जणांवर कारवाई, साडे चार लाखाचा दंड वसुल

team by team
February 7, 2022
in क्राईम
0
पपई व्यापाऱ्याने मामाचे मोहिदे परिसरातील शेतकऱ्यांना लावला ४६ लाखांचा चुना, व्यापाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे दि. २३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान विविध ठिकाणी नाकाबंदी करून विनामास्क धारकांविरध्द कारवाई करण्यात आली. यात २ हजार १९३ जणांविरूध्द गुन्हा दाखल करून ४ लाख ३८ हजार ६०० रूपये दंड वसुल करण्यात आला. तर विविध प्रतिष्ठाने यात शासन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४५ जणांविरूध्द ३८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
दि.२३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२२ या दरम्यान नंदुबार जिल्हा पोलीस दलातर्फे कोरोनासंदर्भात प्रत्येक पोलीस स्टेशनला ठिकठिकाणी नाकाबंदी व फिक्स पॉंईट लावून तसेच पायी पेट्रोलिंग दरम्यान विनामास्क कारवाई करून दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या सीमेला नाकाबंदी करण्यात आली आहे. या कारवाईत त्यात नंदुरबार शहर वाहतुक शाखा- १०७ कारवाई २१ हजार ४०० रूपये दंड, नंदुरबार शहर २३५ कारवाया ४७ हजार दंड, नंदुरबार तालुका १२३ कारवाया- २४ हजार ६०० दंड, उपनगर-१३१ कारवाया २६ हजार २०० दंड, नवापूर २०२ कारवाया ४० हजार ४०० दंड, विसरवाडी ११२ कारवाया २२ हजार ४०० दंड, शहादा ३८० कारवाया ७६ हजार दंड, सारंगखेडा- ११५ कारवाया २३ हजार दंड, म्हसावद २०१ कारवाया ४० हजार २०० दंड, धडगाव १२४ कारवाया २४ हजार ८०० दंड, अक्कलकुवा २१४ कारवाया ४२ हजार ८०० दंड, तळोदा १७५ कारवाया ३५ हजार दंड, मोलगी ७४ कारवाया १४ हजार ८०० दंड असा एकूण विनामास्कच्या २ हजार १९३ केसेस आल्या असून त्यात एकूण ४ लाख ३८ हजार ६०० रूपये दंड वसुल करण्यात आला आहे. तर याच कालावधीत जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील रेस्टॅरंट व उपहारगृहे व इतर आस्थापणाची तपासणी केली असता ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त असलेले व कोविड अनुरूप वर्तन केल्याने जिल्हाभरात ४५ जणांविरूध्द ३८ गुन्हे दाखल करण्यात आला आहे.जिल्हाभरात सर्व पोलीस स्टेशन हद्दीत ठिकठिकाणी पोलीसांकडून नाकाबंदी तसेच पेट्रोलिंग करुन विनामास्क तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणान्या व कोविड नियमांचे पालन न करणार्‍या नागरिकांची कसून तपासणी करण्यात येत आहे . त्याचप्रमाणे आगामी काळात विवाह सोहळे तसेच सामाजिक. धार्मिक सांस्कृतिक,राजकीय कार्यक्रम,मेळावे,संमेलन या ठिकाणी देखील पोलीसांची करडी नजर असणार आहे . शासनाने दिलेल्या कोविड निर्देशांचा भंग झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात नाकाबंदी दरम्यान वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून कोणतीही व्यक्ती मास्कशिवाय प्रवास करतांना आढळल्यास / योग्यरित्या मास्क न घालता आढळल्यास सदर व्यक्तीसह वाहनचालकावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या सिमेवर सुद्धा नाकाबंदी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात एखादी संस्था, आस्थापना ही कोविड अनुरुप वर्तन किंवा मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात अयशस्वी ठरली किंवा एखाद्या व्यक्तीने संस्थेचा किंवा कोणत्याही आस्थापनाच्या आवारात नियमांचे उल्लंघन करतांना मिळून आल्यास पोलीस व महसूल पथकामार्फत संयुक्त कारवाई करुन सदर संस्था. आस्थापना बंद केली जाईल . वरील प्रमाणे नागरिकांवर गुन्हे दाखल झाल्यास त्यांना चारित्र्य पडताळणी दाखला व पासपोर्ट मिळणेकामी अडचणी येऊ शकतात . यापुढे जिल्हा पोलीस दलातर्फे अशीच कारवाई सुरु राहणार आहे . त्यासाठी नागरिकांनी कोविड १ ९ अनुषंगाने शासन निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.

 

 

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत शहादा कृषी महाविद्यालयाची स्मितल सुरेश देवरे हिला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर

Next Post

घराच्या जागेच्या वादावरून पती- पत्नीवर प्राणघातक हल्ला

Next Post
पपई व्यापाऱ्याने मामाचे मोहिदे परिसरातील शेतकऱ्यांना लावला ४६ लाखांचा चुना, व्यापाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

घराच्या जागेच्या वादावरून पती- पत्नीवर प्राणघातक हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीसाठी आज सर्वपक्षीय शोकसभा

January 31, 2026
सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

January 31, 2026
मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

January 30, 2026
भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

January 29, 2026
भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

January 29, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add