म्हसावद l प्रतिनिधी :-
शहादा तालुक्यातील नांदया ने विरपूर येथील निकृष्ट कामाची तपासणी व्हावी या मागणीचे निवेदन विविध पदाधिकारी यांनी सा.बा. विभागाचे उपअभियंताना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, शहादा तालुक्यातील नांदया ने विरपूर तसेच आपल्या सा.बा.विभागामार्फेत रस्त्याचे काम सुरु असून सदरच्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाोहिन कामकाज होत असून सदरच्या कामांवर जे साहित्य वापरण्यात येत आहे ते अंदाजपत्रकानुसार वापरण्यात येत नाही. वरील सदर रस्त्याच्या कामांची चौकशी करण्यात यावी तसेच चौकशी पूर्ण झाल्या शिवाय कामांचे देयक अदा करण्यात येवू नये तसेच केलेल्या चौकशी एक प्रत मला सादर करण्यात यावी अन्यथा यांची सर्व जबाबदारी आपल्या उपविभागाची राहील.निवेदनात काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष सुरेश नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष,जि. प.सदस्य मोहन शेवाळे,प.स.सदस्य सत्यवान दादा,विरपूरचे सरपंच निलसिंग पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर,छोटू कुवर, सोनवदचे सरपंच राजू वाघ, फतेसिंग पाडवी आदींचा सह्या आहेत.








