नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सुलतानपूर गटात जि. प.अध्यक्षा ॲड. ॲड.सिमा वळवी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

शहादा तालुक्यातील जि. प.बांधकाम विभागाने मंजूर केलेल्या राष्ट्रीय ग्राम स्वराज योजनेअंतर्गत टवळाई येथे लघुपाटबंधारे विभाग जिल्हा परिषद अंतर्गत साठवण बंधारा कामाचे भूमिपूजन, अंबापूर येथे जि.प.बांधकाम विभाग अंतर्गत रस्ता कामाचे, रोजगार हमी योजना अंतर्गत गाळ काढणे कामाचे व लघुपाटबंधारे विभाग जिल्हा परिषद अंतर्गत साठवण बंधारा कामाचे भूमिपूजन, गणोर येथे जनसुविधा योजना मधून अमरधाम बाधकामाचे व खरगोण येथे जिल्हा पाणीपुरवठा विभाग अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन जि. प.अध्यक्षा ॲड.सिमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य सुहास नाईक, जि.प.सदस्य कविता पवार, शहादा प.स.उप सभापती वैशाली पाटील, प.स.सदस्य संगिता पाटील, प.स.सदस्य शिवाजी पवार, प.स.सदस्य तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सत्येन वळवी, प.स.सदस्य गोपी पावरा, प.स.सदस्य दिनेश पवार, डाॅ. योगेश पवार, किशोर पाटील, शांतीलाल पाटील, टवळाईचे सरपंच परबत पवार, उपसरपंच अनिता पवार, पो.पा.मोग्या पाडवी, सदस्य सहदेव वाघ, अंबापूरचे सरपंच बायशीबाई पवार, उपसरपंच दिलीप पवार, सदस्य गिरधन पवार, नटवर पवार, शंकुतला पवार, गणोरचे सरपंच विठ्ठल ठाकरे, उपसरपंच अनिता भामरे, सदस्य दिलीप वळवी, बन्शीलाल तडवी, उत्तम तडवी, हिरालाल निकुम खरगोणचे सरपंच शंकर पवार, उपसरपंच महेश पवार, पो.पा.संदिप निकुम, सदस्य योगेश ठाकरे, गौतम ठाकरे आदी उपस्थित होते.








