नंदुरबार शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे बंडातात्या कराडकर यांंनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जाहीर निषेध करुन बंडातात्या कराडकर यांंच्या गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीचे निवेदन नंदुरबार शहर पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खा. सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आषेपार्ह वक्तव्य करणारे बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात आज नंदुरबार शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीतर्फे नंदुरबार शहर पोलीस ठाणे आहे बाहेर जाहीर निषेध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी नंदुरबार जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, जिल्हा चिटणीस जितेंद्र कोकणी, नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, नंदुरबार तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, नगरपंचायत नगरपरिषद संघटना जिल्हाध्यक्ष ॲड.प्रकाश भोई, महिला शहराध्यक्ष उषाताई वळवी, जिल्हा कार्यकारणी सदस्य कांचन मोरे, जिल्हा चिटणीस महिला हंसाताई अहिरे, शहर उपाध्यक्ष राजा ठाकरे, शहर कोषाध्यक्ष सुनील राजपूत, शहर महिला उपाध्यक्ष सोनल चव्हाण, रुपेश जगताप आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.