म्हसावद l प्रतिनिधी
बसवंत गार्डन एक आदर्श कृषी ऊद्योग पर्यटन व ग्रीन झोन ॲग्रो केम यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसावद ता.शहादा येथील प.पू.सती गोदावरी माध्यमिक व ऊच्च माध्यमिक विद्यालयात पर्यावरणवर आधारित चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.यात शाळेतून 27 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
चित्रकलेसाठी परागीभवन करणारी मधमाशी, फुलावर बसलेली मधमाशी,मधाचे पोळे हे विषय देण्यात आले होते.यात इयत्ता पाचवी ते बारावीच्या 27 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.चित्रातून पर्यावरण वाचवा,मधमाशी ही पृथ्वीतलावरीर मानवी जिवनासाठी कीती महत्वाची आहे.हा संदेशही देण्यात आला.मुख्याध्यापिका सुरेखा गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला शिक्षक सुधाकर पाटील यांनी परिश्रम घेतले. ग्रीन झोन ॲग्रो केमचे प्रतिनीधी राहूल भामरे यांनी सहकार्य केले.