तळोदा ! प्रतिनिधी
शहादा बोरद मार्गे तळोदा बस सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शहादा आगारातुन शहादा बोरद ही बससेवा सुरू होती. परंतु कोवीड १९ चा दुसऱ्या लाटेमुळे ग्रामिण भागातील ही बससेवा बंद आहे त्यामुळे ग्रामिण भागातील लोकांना शहादा आणि तळोदा या तालुका मुख्यालयी शासकीय कामासाठी, रुग्णालयात उपचार घेण्यासाठी,इ.कारणासाठी जाण्यायेण्याच्या कामासाठी कोणतीही बससेवा सुरू नसल्याने. नागरिकांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो.किंवा अवैध वाहतूक करणाऱ्या वाहणातुन जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. तरी दोन्ही तालुक्यातील गावातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी शहादा आगारातुन दिवसातून दोन तीन वेळा जरी बससेवा सुरू झाल्या तर लोकांना सुरक्षित प्रवासाची सोय होईल तसेच खाजगी वाहनाने प्रवास करताना होणारी आर्थिक पिळवणूक ही थांबेल तरी ही बससेवा सुरू करून ग्रामिण भागातील प्रवाशांची गैरसोय काही प्रमाणात कमी होईल तरी ग्रामिण भागातील प्रवाशांचा सोयीसाठी ग्रामिण भागातील बससेवा सुरूळीत पणे सुरू होत नाही तोपर्यंत तरी ही बससेवा सुरू करून देण्यासाठी शहादा, आणि अक्कलकुवा आगारप्रमुख यांनी प्रयत्न करावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.