म्हसावद l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाईडस,मुंबई यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरासाठी नंदुरबार जिल्ह्यातून 49 स्काउट्स 68 गाईड्स यांनी सहभाग नोंदविला आहे.या सर्व विद्यार्थ्यांची लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षांची जिल्हा स्तरावर तयारी करून घेण्यासाठी जिल्हा परिषद,शिक्षण विभाग नंदुरबार आणि नंदुरबार भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 ते 2 फेब्रुवारी 2022 या कालावधीत एस. ए. मिशन हायस्कूल,नंदुरबार येथे पूर्वतयारी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या दोन दिवसांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेश ते तृतीय सोपान अभ्यासक्रमावर आधारित लेखी,तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे मार्गदर्शन करण्याकरिता शिबिर प्रमुख हेमंत पाटील,हिरालाल पाटील, संकेत माळी, प्रसाद दीक्षित,इच्छाराम बैसाणे,छाया पाटील,शारदा पाटील,पुनम नेरकर, सुषमा फुलंब्रीकर, आशा पाडवी,कल्पना गवळे आदींनी मोलाचे मार्गदर्शन केले.या पूर्वतयारी वर्गाकरिता डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल नंदुरबार,कमला नेहरू कन्या विद्यालय नंदुरबार,राजे शिवाजी माध्यमिक विद्यालय नंदुरबार,श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूल नंदुरबार, एस ए मिशन इंग्लिश मीडियम स्कूल नंदुरबार, पी.के. पाटील माध्यमिक विद्यालय नंदुरबार प्राचार्य भाईसाहेब गो.हू. महाजन न्यू हायस्कूल तळोदा शारदा कन्या विद्या मंदिर शहादा वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय शहादा या विद्यालयात मधून एकूण 117 स्काऊटस आणि गाईड्स यांनी सहभाग नोंदविला. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी एस.ए. मिशन इंग्लिश मीडियम स्कूल,नंदुरबार च्या प्राचार्या श्रीमती डॉ.सुनिता अहिरे मॅडम उपस्थित होत्या तर शिबिराच्या समारोप प्रसंगी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक (प्रभारी )डॉ.युनूस पठाण हे उपस्थित होते.त्यांनी जिल्ह्यातील कब बुलबुल स्काऊट गाईड यांच्या गुणात्मक विकासाबाबत समाधान व्यक्त करून सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि मुख्य परीक्षे साठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नंदुरबार जिल्ह्याचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष पुष्पेन्द्र रघुवंशी,एस ए मिशन हायस्कुलच्या प्राचार्या श्रीमती नूतन वर्षा वळवी या उपस्थित होत्या. जिल्हास्तरीय शिबिरात यशस्वी होणाऱ्या स्काउट्स आणि गाईड्स ची मुख्य राज्य स्तरीय परीक्षा हस्ती भवन दोंडाईचा जिल्हा धुळे येथे दि.22ते 28 फेब्रुवारी 2022या कालावधीत होणार आहेत.
शिबिराच्या यशस्वितेसाठी जिल्हा संघटक श्रीमती कविता वाघ, लिपिक ज्ञानेश्वर सावंत व शिपाई योसेफ गावित यांनी परिश्रम घेतले.