नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील वनविभागाच्या पथकाने पांघरण व ढोंग येथील दोघांच्या घराची तपासणी केली असता 90 हजार रुपये किमतीचे सागाचे 97 नग जप्त केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सहाय्यक वनसंरक्षक(प्रा व वन्यजीव)नंदुरबार धनंजय ग.पवार यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून, वनक्षेत्रपाल नवापूर, प्रा.वनक्षेत्रपाल चिचपाडा, प्रा.सह वनक्षेत्र स्टॉप नंदुरबार प्रा.नंदुरबार रोहयो, चिचपाडा प्रा.नवापूर प्रा. सह श्रावणी गावा जवळील बन्सीलाल गणेश बागुल रा.पांघरण यांच्या घराचे सर्च वॉरंट घेऊन तपासणी केली असता सागाचे नग 55 आणि उमेश हिरालाल कोकणी रा.ढोंग ता. नवापूर यांच्या घराच्या सर्च वॉरंट घेऊन तपासणी केली असता सागाचे नग 42 असे एकूण 97 नग जप्त करून विक्री आगार नवापूर येथे जमा केले असून जप्त मालाची बाजारभावानुसार एकूण किंमत 90 हजार रुपये आहे.याबाबत वनक्षेत्रपाल चिंचपाडा यांनी वनगुन्हा दाखल केला असून सदर कारवाही सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार
धनंजय पवार, वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक स्नेहल अवसरमल,वनक्षेत्रपाल चिचपाडा शिवाजी रत्नपारखे, प्रादेशिक, वनपाल पी.डी.पवार, सुनंदा वंदे,वनरक्षक कल्पेश अहिरे,तुषार नांद्रे,कमलेश वसावे, दीपक पाटील,अशोक पावरा,गिरीश वळवी, संतोष गायकवाड, अरविंद निकम,भूपेश तांबोळी,सुनील करवळकर बिलाल शहा,किसन वसावे, पुनम सोनवणे,प्रतिभा पवार,रेखा गिरासे, नयना हडस,वाहन चालक आबा न्याहळदे, लालसिंग पवार,रवी गिरासे,माजी सैनिक रवींद्र कासे,व कायम वनमजूर कर्मचारी यांनी सहभाग भाग घेतला. होता सदर कार्यवाही ही
वनसंरक्षक धुळे दि.वा. पगार,उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा कृष्णा भवर, उमेश वावरे,विभागीय वनअधिकारी दक्षता धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा यांच्याकडून जनतेस आवाहन करण्यात येते आहे की, वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा.








