नवापुर l प्रतिनिधी
नवापुर आगारात विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संपावर असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांना जि.प.सदस्य भरत गावित यांच्या सुचनेने युवा नेते धनंजय गावित यांच्या स्वखर्चातुन 53 कर्मचाऱ्यांना किराणा किट वाटप करण्यात आले.
नवापुर येथे एस.टी. महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण व इतर विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला जि.प.सदस्य भरत गावित यांच्या सुचनेने युवा नेते धनंजय गावित यांनी भेट दिली, व स्वखर्चातून एस.टी. कर्मचाऱ्यांना संसारोपयोगी किराणा किट वाटप करण्यात आले. यावेळी एस.टी. महामंडळाचे कर्मचारी यांनी भरत गावित व युवा नेते धनंजय गावित यांच्या या सिंहाचा वाटा बद्दल मनस्वी आभार मानले व एस. टी. कर्मचारी सदैव भरत गावित यांच्या सोबत राहिल असे प्रतिपादन व्यक्त केले. यावेळी एस.टी. महामंडळाच्या माता-भगिनी, कर्मचारी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.