Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोड शिवारात पडक्या विहिरीत बिबट्या आढळला मृतावस्थेत, परिसरात उडाली खळबळ

team by team
February 1, 2022
in कृषी
0
मोड शिवारात पडक्या विहिरीत बिबट्या आढळला मृतावस्थेत, परिसरात उडाली खळबळ

नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील मोड येथील दिलीप कथ्थु चौधरी यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या मृत्यू मुळे पर्यावरण प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा तालुक्यातील मोड येथील दिलीप कत्थु पाटील यांच्या सर्वे नंबर २५ मोड शिवारातील असलेल्या जुनाट विहिरीमध्ये मृतावस्थेत बिबट आढळला ज्या विहिरीत बिबट होता ती विहीर कोरडी असून गेल्या २० वर्षापासून या विहिरीत पाणीच नाही. त्यातच बिबट पाच ते सहा दिवसांपूर्वी विहिरीत पडला असेल असा अंदाज आहे व्यक्त करण्यात येत आहे. शेतमालक दिलीप पाटील यांनी दुर्गंधीचा वास कसा येतो आहे.ते पाहण्यासाठी शेतात सर्व बाजूने पाहिले. शेवटी विहिरीत पाहिले असता त्या ठिकाणी त्यांना बिबट पडलेला दिसला. त्यांनी वन अधिकारी यांना फोन लावून सांगितले. वनक्षेत्रपाल निलेश रोढे आणि वन खात्याची संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचली आणि बिबट ला त्यांनी विहिरीत विहिरीतून बाहेर काढले. ही या विभागातील तिसरी घटना आहे. या घटनेचे शवविच्छेदन केले असता बिबट मादि गेल्या तीन दिवसांपूर्वी तोंडावर पडल्याने तोंडाचा भाग सर्व खराब झालेला आहे. त्यामुळे तिचा आवाज बंद झाला असावा म्हणूनच ती ४ वर्षाची बिबट मादी मेली असल्याचा अंदाज तळोदा तालुका पशुधन अधिकारी डॉक्टर विश्वासराव नवले यांनी सांगितले. ही मादी १२.२ फूट लांब होती वन अधिकारी वनक्षेत्रपाल निलेश रोढे, जी. पी. गांगुर्डे वनपाल नंदू पाटील, अपर्णा लोहार, डी.आर.खोपे गिरधर पावरा, वीरसिंग पावरा, आर.जे. शिरसाठ डॉक्टर विश्वासराव नवले शेतमालक दिलीप पाटील जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत शेतातच संबंधित बिबटचे अंत्यसंस्कार करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार -2021 प्रवेशिका पाठविण्याकरिता 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Next Post

राज्यात एक फेब्रुवारीपासून नवीन नियमावली लागू, लग्नात २०० लोकांना परवानगी

Next Post
राज्य सरकारने राज्यातील नाईट कर्फ्यूसह सर्व निर्बंध शिथिल, लग्नासाठी 200 व्यक्तींची मर्यादा

राज्यात एक फेब्रुवारीपासून नवीन नियमावली लागू, लग्नात २०० लोकांना परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add