नंदूरबार l प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास विभागातर्गत सन 2021-2022 या वर्षांत केंद्रवर्ती अर्थसंकल्प न्यूक्लिअस बजेट योजनातर्गत वैयक्तिक व सामुहिक योजनेचा लाभ देण्यासाठी नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून 10 फेब्रुवारी 2022 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहे.
वैयक्तिक व सामुहिक योजनेखाली अनुसूचित जमातीच्या बचत गटाचे उत्पन्न वाढीसाठी कापडी पिशवी, लग्नपत्रिका, कागदपिशवी व इतर वस्तु छपाई मशिन खरेदी करण्यासाठी 85 टक्के अर्थसहाय्य देण्यात येईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत जातीचा दाखला, रहिवास दाखला,रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅनकार्ड, सातबारा उतारा, घराचा उतारा नमुना क्रमांक 8, बॅक पासबूक, विद्युत देयक, अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, ग्रामसभेचा ठराव,बचत गटाची यादी तसेच यापुर्वी इतर शासकीय योजनामधुन लाभ न घेतल्याचा दाखला (स्वयंघोषणापत्र) इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
अधिक माहिती व अर्जासाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नवापूर रोड,नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.








