नंदूरबार l प्रतिनिधी
राज्यात जानेवारी महिन्यात राज्य सरकारने नाईट कर्फ्यू आणि कडक निर्बंध लागू केले होते . पण , आता परिस्थितीत आटोक्यात आल्यामुळे सर्व निर्बंध हटवण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली आहे आज म्हणजेच 1 फेब्रुवारी 2022 पासून कोविड संसर्ग रोखण्यासंदर्भातील राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुधारित आदेश जारी करण्यात आले आहे .
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 8 जानेवारी रोजी जे निर्बंध लागू करण्यात आले होते , ते आता हटवण्यात आले आहे .
या नियमावलीमध्ये केला हा बदल
राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री उशीरापर्यंत सुरू राहणार , 50 टक्के क्षमतेची परवानगी.
लग्नासाठी 200 व्यक्तींची मर्यादा सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय किंवा धार्मिक असो , कोणत्याही मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत बंदिस्त जागेत असो किंवा खुले असो , उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या २०० व्यक्तींपुरती मर्यादित असेल .
– मैदाने , उद्याने आणि पर्यटन स्थळे 50 टक्के क्षमतेनं सुरू राहणार –
सलून 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील .
राज्यातील थिएटर फक्त 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील
स्विमिंग पूल , स्पा , जिम सुरू मुंबई लोकल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत .