नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर शहरातील देवळफळी भागात मारहाण करु नका असे सांगितल्याचा राग आल्याने तिघांना लोखंडी पट्टीने मारहाण केल्याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील ईस्लामपूरा भागातील रमजान गणी शाह यांच्या गल्लीतील इसमास जाकीर मुनाफ शेख हा मारहाण करीत होता. यावेळी रमजान शाह यांनी मारु नका असे सांगितले. याचा राग आल्याने जाकीर मुनाफ शेख, जावेद मुनाफ शेख व अनिस राजू मक्राणी (रा.देवळफळी ता.नवापूर) यांनी रमजान गणी शाह, आसीफ कलीम शाह, मुजीप रुबाब शाह यांना लोखंडी पट्टीने मारहाण केली. तसेच हाताबुक्यांनी मारहाण करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत रमजान शाह यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.दादाभाई वाघ करीत आहेत.