म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कुसुमवाडा येथील रहिवाशी नामदेव मधू पवार व रमेश सधु पवार यांच्या मालकीच्या ऊसाच्या शेताला अचानक आग लागून सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली.
शहादा तालुक्यातील कुढावद शिवारात असलेले येथील नामदेव मधू पवार व रमेश सधु पवार यांच्या सहा एकर शेतातील सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. यात शेतकऱ्याचे पाच लाख 64 हजाराचे नुकसान झाले संबंधित शेतकऱ्यांना आपल्या पिकाची भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. संबधित शेतकऱ्याने व्याजाने पैसे काढून हाता तोंडाशी आलेला घास शेतकऱ्याच्या ऊस जळून खाक झाल्याची खंत व्यक्त केली आहे. संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत ऊस कशामुळे जळाला हे अद्याप पर्यंत समजले नाही .हा उसाची नोंद समशेरपूर येथील पुष्पदंतेश्वर साखर कारखाना येथे नोंद असल्याचे संबधित शेतकऱ्यांनी सांगितले.