तळोदा l प्रतिनिधी
अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी लावण्यावरून एकास चौघांनी मारहाण करीत दुखापती केल्याची घटना दगाढवली गावाजवळ घडली याप्रकरणी चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी प्राप्त माहिती अशी की, तळोदा तालुक्यातील अलवान येथील सुरपसिंग बामजी नाईक याने माझी सून निशा नाईक हिस अंगणवाडी सेविका नोकरीला लावायचे आहे.तू तुझा सुनेला अंगणवाडी सेविका म्हणून नोकरीस लावू नको असे सांगीतले असता त्यास पानसिंग बाज्या राहसे म्हटला कि माझी सुने शांताबाई राहसे ही गुणवत्ता यादीत आली आहे. तिथे अंगणवाडी सेविका म्हणून लागेल याचा राग येऊन सुरुपसिंग नाईक, रमेश नाईक यांनी हातात काठ्या घेऊन पालसिंग राहसे यास पायावर कमरेवर, हातावर व पाठीवर मारहाण केली राजेश नाईक कुवरसिंग पवार यांनी हाताबुक्क्यांने मारहाण केली पालसिंग राहसे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. विजय वसावे हे करीत आहे.