नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील लायन्स क्लब इंटरनॅशनल,लायन्स क्लब फेमिना, लायन्स क्लब फेमीना आणि सतगुरु स्पीच अॅण्ड हिअरींग क्लीनिक यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत श्रवण (बहीरेपणा) तपासणी शिबीराचे उद्वघाटन डॉ.तेजल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबीरात कमी येकु येणे व न येकु येणे( जन्मत: जन्मानंतर व वयानुसार जेष्ठ नागरिकांना ऐकण्याचा त्रास ऑपरेशन करुन सुद्धा न ऐकु येणे बोलण्यातील समस्या (वाचा दोष) बोबडेपणा, तोञेपणा, बोलतेवेळी अटकने, फाटलेले ओठ, नाकातुन आवाज येणे, कानातुन शिटी सारखा आवाज येणे,मशिन लावुन सुद्धा ऐकु न येणे.अदि समस्या वर उपचार करण्यात आले.शिबीरात लायन्स फेमिना क्लबच्या अध्यक्ष हिना रघुवंशी ,सेक्रेटरी सीमा मोडक,कांचन मुलांनी उपस्थित होत्या. तसेच शिबिरात येणाऱ्या गरजू रुग्णांची तपासणी डॉ. कल्पेश चौधरी यांनी केली. व त्यांना डॉ.परीमल चौधरी यांनी रूग्ण तपासण्यास सहकार्य केले शिबिरात एकंदर ७५ रुग्णांनी लाभ घेउन तपासणी करून घेतली.