नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य, अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर (राज्यमंत्री दर्जा ) हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
श्री. अभ्यंकर यांचा दौरा असा : गुरुवार 3 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9 वाजता सोनगीर जि.धुळे येथून नंदुरबारकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता नंदुरबार येथे आगमन. सकाळी 11.15 ते 1 वाजेपर्यंत अनुसूचित जाती जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ जिल्हा परिषद, सभागृह नंदुरबार ) दुपारी 1 ते 2.30 वाजता अध्यक्ष, जात पडताळणी समिती नंदुरबारकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा तसेच समितीला येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा. दुपारी 2.30 ते 3 पर्यंत अल्पसंख्याक व अनुसूचित जाती जमाती संघटना व व्यक्तींची निवेदने स्वीकारणे व चर्चा करणे. दुपारी 3 वाजता मुंबईकडे प्रयाण.