नंदूरबार l प्रतिनिधी
म्हसावद ते धडगांव रोडवर पिप्राणी फाट्याजवळ
बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीचा कट्टासह दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 31 जानेवारी रोजी अमावस्या असल्याने अमावस्येच्या काळात गुन्हेगार सक्रिय होवून मालमत्ते विरुध्दचे गुन्हे करण्याची दाट शक्यता असते तसेच आगामी सण व उत्सवाच्या अनुषंगाने समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत या दृष्टीकोनातुन दि. 30 चे 23 ते 31 जानेवारी रोजी 5 वाजेदरम्यान नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यात नाकाबंदी योजनेचे आयोजन करुन अवैध शस्त्र बाळगणान्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते . त्याअनुषंगाने दि.30 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अमलदार नाकाबंदी व गस्त करीत असतांना पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की , सुलतानपुर ता . शहादा येथील दोन इसम बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीचे पिस्तुल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहे.अशी माहिती मिळाल्याने पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत म्हसावद ते धडगांव रोडवर पिप्राणी फाट्याजवळ सापळा लावून बसलेले असतांना दि. 31 जानेवारी रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास कृष्णा जलु पाडवी, अनिल भुन्य ठाकरे दोन्ही रा . सुलतानपुर ता. शहादा यांची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 10 हजार रुपये किमतीचे लोखंडी बनावटीचे पिस्तुल ( गावठी कट्टा ) मिळुन आल्याने दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द् म्हसावद पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस हवालदार विनोद जाधव , पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव , विकास कापुरे यांनी केली आहे .