तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथे प्लॉट खरेदी करून देतो असे सांगून 12 लाख 11 हजार 120 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा येथील अनिल कोचर व चंपालाल कोचर राहणार तळोदा यांनी डिसेंबर 2010 ते 30 जानेवारी 2022 पर्यंत शेख नूर मोहम्मद सत्तार यांना प्लॉट खरेदी करून देतो असे सांगून पंधरा लाख रुपये डिसेंबर 2010 ते 30 जानेवारी 2022 पर्यंत घेऊन यापैकी 28 हजार 880 रुपये प्लॉट भाडेतत्त्वावर घेण्याकरता नरडाणा येथील ऑफिसमध्ये गुंतवले व शेख नूर मोहम्मद सत्तार यांचे 12 लाख 11 हजार 120 रुपये स्वतःच्या फायद्याकरता वापरून त्यांची फसवणूक केली म्हणून याबाबत शेख नूर मोहम्मद सत्तार रा. बडरी कॉलनी, तळोदा यांच्या फिर्यादीवरुन अनिल कोचर व चंपालाल कोचर रा. तळोदा यांच्या विरूद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक केलंसिंग पावरा यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार अधिक तपास करत आहेत.