तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील सोरापाडा येथील बिरसा मुंडा स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आली.
कार्यक्रमास अकॅडमीचे सदस्य रवींद्र पाडवी यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमा पूजन करून अभिवादन केले, प्रमुख अतिथी अकॅडमीचे सहकारी शिक्षण रंजन केंद्र सोरापाडाचे शिक्षण मित्र रामसिंग पाडवी यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधी यांच्या जीवन पटावर खेळाडू ना माहिती दिली.अकॅडमीचे सचिव व राष्ट्रीय खेळाडू अनमोल पाडवी यांनी जयंती व पुण्यतिथी हे महान कार्य करणाऱ्या लोकांची साजरा करण्यात येते, देशाचं गावच नाव मोठं करायचं असेल तर मेहनत करा आपल्या क्षेत्रात नांव मोठं करा अस सांगितलं मेहुल पाडवी, कल्याणी पाडवी, पौर्णिमा वळवी यांनी एरियल स्पोर्ट्स करून दाखवलं, याप्रसंगी विजया वळवी, जास्मिन पाडवी, पियुष वळवी, दर्पणा पाडवी, प्रिन्स पाडवी, नम्रता वसावे, महेश्वरी पाडवी, प्रियाग्नी वळवी, प्रेरणा पाडवी आदी उपस्थित होते.