नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील रेल्वेस्थानकात जवळ गांधीधाम-पूरी एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कोचला आग लागल्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास सदर रेल्वे रवाना झाली.त्यानंतर आज सायंकाळी पश्चिम रेल्वेचे विभागीय प्रबंधक विशेष रेल्वेने नंदुरबार येथे घटनास्थळी दाखल होत घटनेचा आढावा घेतला.रात्री आठ वाजेच्या सुमारास ते परळकडे रवाना झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की,आज सकाळी
नंदुरबार येथील रेल्वेस्थानकात जवळ गांधीधाम-पूरी एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कोचला आग लागल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई सेंट्रल रेल्वेचे प्रबंधक श्री.सत्यप्रकाश नंदुरबार रेल्वे स्थानकावर तांत्रिक विभागाच्या पथकासोबत दाखल झाले.नेमकी आग लागली कशी?याबाबत चौकशी करण्यासाठी रेल्वे प्रबंधकांचे विशेष पथक दाखल झाले होते. पॅन्ट्री कोचमध्ये स्वयंपाक करण्यात येतो.मात्र कोरोनामुळे रेल्वेत पॅन्ट्री बंद आहेत.असे असतांना नेमकी आग शॉटसर्कीट, इलेक्ट्रीक शेगडी कि इतर काही कारणाने लागली याची चौकशी सुरू होती. रेल्वे प्रंबंधक नंदुरबार येथे दाखल झाल्यावर त्यांनी आगीत खाक झालेल्या पॅन्ट्री कारची पाहणी केली.सुमारे अर्ध्या तासापर्यंत रेल्वे प्रबंधकांनी पथकासह पाहणी केली.दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करत घटनेबाबत माहिती घेतली. रेल्वे प्रबंधकांनी आढावा घेतला असून आता नेमकी काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.रात्री आठ वाजेच्या सुमारास पश्चिम रेल्वेचे विभागीय प्रबंधक विशेष रेल्वेने परळकडे रवाना झाले.