नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील मुंदलवड येथे चर्च शताब्दी महोत्सव साजरा उत्साहात करण्यात आला.यावेळी देवाची स्तुती गीते गात शोभायात्रा काढण्यात आली.
एस.ए.मिशन ट्रस्टचे पहिले चर्चची स्थापना सन 1922 साठी धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात मुंदलवड याठिकाणी झाली.रेव्ह ए.पी.फ्रॅंकलिन यांनी शंभर वर्षांपूर्वी येथे एस. ए. मिशनच्या प्रथम चर्चची स्थापना केली, आज मुंदलवड चर्चचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी सुरुवातीला देवाची स्तुती गीते गात शोभायात्रा काढण्यात आली.त्यात चर्चेचे सर्व लहान-थोर सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते, कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. चर्चच्या व संस्थेच्या स्थापनेचा इतिहास व प्रास्ताविक एस.ए.चर्च चे चेअरमन डॉ. राजेश वळवी यांनी केली, उपकार स्तुती गीते एस.एम क्वायर ग्रुपने सादर केली, उपकरस्तुतीचा संदेश रेव्ह.जे.एच. पठारे यांनी दिला. ग्लॅडविन जयकर यांनी प्रार्थना केली.मुंदलवड कार्य केलेल्या सर्व धर्मगुरूंच्या सत्कार स्थानिक मंडळीचे अध्यक्ष संजय गार्दी, रविकांत वळवी, विरेन्द्र गार्दी यांनी चर्चतर्फे केला. सदर कार्यक्रमाची सांगता समर्पणाच्या प्रार्थनेने झाली, कार्यक्रमासाठी सौ.नुतनवर्षा वळवी,पी.डी. लवणे, श्रीमती मार्था सुतार,रेव्ह.आर.के.वळवी, शांतवन गार्दी, संतोष देशपांडे, रेव्ह. आनंद पटेल,रेव्ह.अनुप वळवी. आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेव्ह.अनुप वळवी यांनी केले.