नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील मोहिदा चौफुलीवर रस्त्यावर लोखंडी बनावटीची पिस्तोल व २ जिवंत काडतुस बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील मोहिदा चौफुलीवर रस्त्याचे बाजुला सार्व जागी शेमळे प्रल्हाद वेडु हा त्याच्या ताब्यात विना पास परमिटशिवाय मानवी जिवीतास घातक असलेली वर नमुद वर्णनाची व किंमतीची एक गावठी बनावटीचे लोखंडी सिल्वर रंगाचे पिस्तोल कब्जात बाळगतांना वरील ठिकाणी मिळुन आला पोलिसांनी ३५ हजाराचे लोखंडी बनावटीची पिस्तोल व ४०० रु कि . २ जिवंत काडतुस जप्त केले. याप्रकरणी पोशि दिनकर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात शेमळे प्रल्हाद वेडु रा- हनुमान मंदीर जवळ कुकडेल शहादा यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार का क ३ चे उल्लंघन २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी पुढील तपास पोह मेहेरसिंग वळवी करीत आहेत.