Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

फोरव्हीलर व मोटारसायकलची समोरासमोर झालेल्या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार तर ६ जण जखमी, चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

team by team
January 28, 2022
in क्राईम
0
शहादा लोणखेडा बायपासवर बोलेरो व दुचाकीचा भीषण अपघात, एक ठार तर ६ जण जखमी

नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा-लोणखेडा बायपासवर फोरव्हीलर व मोटारसायकलची समोरासमोर झालेल्या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार तर ६ जण जखमी झाले. यातील एक जण गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी धडगाव तालुक्यातील सिंधिदिगर येथील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
शहादा लोणखेडा बायपास रस्त्यालगत असलेल्या पाटीदार मंगल कार्यालयासमोर दि.२६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास सिंधिदिगर येथील रहिवासी बोलेरो (क्र.एम.एच.३९ जे.३७९०) ने जात असतांना कळंबू येथील दोघे म्हसावद येथे लग्नासाठी दुचाकीने (क्र.एम.एच.३९, पी.८५५४ ) ने जात असताना बोलेरो व मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार अजय सुभाष मोरे (२५) रा. कळंबू ता. शहादा याचा जागीच मृत्यू झाला तर सागर सोमा सोनवणे रा.कळंबू ता. शहादा यांना गंभीर दुखापत झाली त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर बोलेरो गाडी तीनदा उलटली. त्यामुळे बोलेरो गाडीतील ५ जण जखमी झाले. जखमींमध्ये भार्‍या कहर्‍या नाईक, चिंडुबाई भार्‍या नाईक, कुसमटीबाई रेहमलसिंग पावरा, जाडया मोसा नाईक यांचा समावेश आहे. त्यांच्यावर म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. सागर सोमा सोनवणे रा.कळंबू ता.शहादा हा गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत नंदिनी श्रीराम पावरा हिने दिलेल्या फिर्यादीनुसार खुमानसिंग गेमाल नाईक रा. सिंदीदिगर ता. धडगाव जि.नंदुरबार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ तारसिंग वळवी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

दलीतवस्ती सुधार योजनेंतर्गत नंदुरबार व शहादा तालुक्यातील काही गावांमध्ये नियम डावलून निधी वाटप : जि. प.सर्वसाधारण सभेत जि.प.सदस्यांचा आरोप

Next Post

सुजलॉनने बळकावलेल्या शेत जमिनीच्या खरेदीची चौकशी करा, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेची मागणी

Next Post
सुजलॉनने बळकावलेल्या शेत जमिनीच्या खरेदीची चौकशी करा, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेची मागणी

सुजलॉनने बळकावलेल्या शेत जमिनीच्या खरेदीची चौकशी करा, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add