Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर, धडगाव नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी खुला प्रवर्ग

Mahesh Patil by Mahesh Patil
January 27, 2022
in राजकीय
0
राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर, धडगाव नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी खुला प्रवर्ग

नंदूरबार l प्रतिनिधी
राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये १३९ नगरपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर खुल्या प्रवर्गासाठी १०९ नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.दरम्यान धडगाव-वडफळ्या
नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी खुला प्रवर्ग (सर्वसाधारण ) असणार आहे
नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतप्रसंगी उपसचिव श्रीमती प्रियांका कुलकर्णी-छापवाले, अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे हे प्रत्यक्ष तर अमरावती, नागपूर, कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक या विभागीय आयुक्त कार्यालयांमधून जिल्हा प्रशासन अधिकारी आणि संबंधित नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
ज्या १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आज सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले त्या नगरपंचायतीचे आरक्षण प्रवर्गनिहाय खालीलप्रमाणे-
अनुसूचित जातीसाठी अध्यक्षपदाच्या १७ जागा असून त्यातील ९ जागा या अनुसूचित जाती (महिला) तर ८ जागा या अनुसूचित जाती (सर्वसाधारण) साठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.*
■ अनुसूचित जाती (महिला) राखीव- लाखणी, कुही, नातेपुते, खंडाळा (जि. सातारा), जळकोट (लातूर), माळेगाव बुद्रुक, पाटण, देहू, वैराग (सोलापूर)

■ अनुसूचित जाती (सर्वसाधारण) राखीव- म्हाळुंग श्रीपूर, भिसी, केज, देवणी, वाशी, औंढा नागनाथ, संग्रामपूर, लोणंद
अनुसूचित जमाती प्रवर्गात अध्यक्षपदासाठी एकूण १३ जागा राखीव असून त्यातील ७ अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी तर ६ जागा अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी सोडतीद्वारे आरक्षित करण्यात आल्या आहेत.
■ *अनुसूचित जमाती (महिला) राखीव- धानोरा, अहेरी, मोहाडी, बाभुळगाव, साक्री, सोयगाव, शहापूर

■ अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)- दिंडोरी, देवरी, गोंडपिंपरी, राळेगाव, भिवापूर,सडक अर्जुनी
खुल्या प्रवर्गासाठी एकूण १०९ अध्यक्ष पदे असून त्यातील ५५ अध्यक्षपदे हे महिलांसाठी राखीव निश्चित करण्यात आले आहेत.
■ खुला प्रवर्ग (महिला) राखीव- कळंब, समुद्रपूर, अर्जुनी मोरगाव, अनगर, पारशिवनी, मंठा, शेंदुर्णी, हिंगणा, वाभवे वैभववाडी, खालापूर, बदनापूर, चामोर्शी, भातकुली, महादुला, वाडा, वडूज, रेणापूर, दापोली, शिंदखेडा, एटापल्ली, देवगड-जामसंडे, जामणी, कारंजा, महागाव, नायगाव, शिरुर अनंतपाळ, पालम, सिरोंचा, पोलादपूर, कोरपना, देवरुख, देवळा, सेनगाव, लांजा, सावली. फुलंब्री, कोरची, तिर्थपुरी, तळा, पोंभुर्णा, जाफ्राबाद, पाटोदा, जिवती, शिर्डी, कुडाळ, निफाड, धारणी, कर्जत, कुरखेडा, वडगाव मावळ, कोरेगाव, सेलू, आष्टी, सालेकसा, शिरुर-कासार,

■ खुला प्रवर्ग (सर्वसाधारण)- गुहागर, अकोले, मुक्ताईनगर, घनसावंगी, मानोरा, मंडणगड, माहूर, आष्टी (वर्धा), कवठे महांकाळ, लोहारा (बु), खानापूर, बार्शी-टाकळी, नांदगाव खंडेश्वर, मुरबाड, ढाणकी, कळवण, हातकणंगले, मुलचेरा, आजरा, दहिवडी, कणकवली, पेठ, पाली, बोदवड, तिवसा, मोताळा, मारेगाव, गोरेगाव, मंचर, मेढा, हिमायतनगर, मौदा, लाखांदूर, भामरागड, सिंदेवाही, मालेगाव-जहांगीर, वडवणी, सुरगाणा, अर्धापूर, चाकूर, धडगाव-वडफळ्या, पारनेर, नेवासा, तलासरी, मोखाडा, विक्रमगड, माणगाव, म्हसळा, कसई-दोडामार्ग, कडेगाव, शिराळा, माळशिरस, माढा, चंदगड.

सन २०२० च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. १२ नुसार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार नगरपंचायतींचे नगराध्यक्ष हे प्रचलित पद्धतीने नगरसेवकांमधूनच निवडले जात असून त्यांचा पदावधी अडीच वर्षे इतका करण्यात आला आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करताना राज्यातील नगरपंचायतींमध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे राज्यातील नगरपंचायतींमधील एकूण लोकसंख्येशी जे प्रमाण असेल त्या प्रमाणानुसार अध्यक्षांची पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक प्रवर्गात निम्म्यापेक्षा कमी नाहीत इतकी पदे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. एखादी नगरपंचायत अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी येत असल्यास तेथे ज्या प्रवर्गाच्या लोकसंख्येची टक्केवारी अधिक आहे, अशा प्रवर्गासाठी ती राखीव ठेवण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जलजीवन मिशन अंतर्गत शनिमांडळ ,रनाळे आणि प्रकाशा गावच्या पाणी पुरवठा योजनांना 23 कोटी 76 लाखांचा भरीव निधी मंजुर, शिवसेनेसह ग्रामस्थांनी केलेल्या पाठपुराव्याला यश

Next Post

शनिमांडळ येथील उपविद्युत सबस्टेशनची विज इतर कुठल्याही गावांना दिल्यास आंदोलन छेडण्याचा गावकऱ्यांचा इशारा

Next Post
शनिमांडळ येथील उपविद्युत सबस्टेशनची विज इतर कुठल्याही गावांना दिल्यास आंदोलन छेडण्याचा गावकऱ्यांचा इशारा

शनिमांडळ येथील उपविद्युत सबस्टेशनची विज इतर कुठल्याही गावांना दिल्यास आंदोलन छेडण्याचा गावकऱ्यांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

October 21, 2025
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

October 21, 2025
चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group