नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ , रनाळे तसेच शहादा तालुक्यातील प्रकाशा या गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लागला आहे . जल जीवन मिशन अंतर्गत या गावांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देत या कामासाठी 23 कोटी 76 लाख 4 हजारांचा निधीला मंजुरी देण्यात आली असुन तसे शासन निर्णय देखील निर्गमीत करण्यात आले आहे . यासाठी जिल्हयातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नेतृत्वाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे .
जिल्हयातील देवस्थानांसह मोठी गावे म्हणुन शनिमांडळ , प्रकाशा आणि रनाळेची ओळख मात्र या परिसरात पडणारे कमी पर्जन्यमानामुळे गावकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होत होती . पाण्यासाठी गावकऱ्यांची होणारी भटकंती , हाल लक्षात घेवून शनिमांडळ गावात असणाऱ्या ब्रिटीशकालीन तलावातुन पाण्याचा कायम स्त्रोत असल्याने त्यातुन नळाद्वारे पाणी पुरवठा केल्यास शनिमांडळ गावच्या पाण्याचा प्रश्न कायस्वरुपी मार्गी लागणार होता . शनिमांडळ प्रमाणेच रनाळे गावात सुध्दा पिण्याच्या पाण्यासाठी अशीच काहीशी बिकट परिस्थती होती . याठिकाणी देखील गावच्या पाण्याच्या स्त्रोतातून नळ योजना सुरु केल्यास गावात पाण्याची समस्या मिटणार होती . याच अनुषंगाने जिल्हा प्रमुख विकांत मोरे , आमश्या पाडवी , शिवसेना नेते मा . आ . चंद्रकांत रघुवंशी , शिवसेना जिल्हा समन्वयक दिपक गवते , जि. प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, जि.प. सभापती कृषी व पशुसंवर्धन गणेश पराडके, जि.प.सदस्य सौ . शंकुतला सुरेश शिंत्रे रनाळा गावचे सरपंच सौ . तृष्णा गवते , सुरेश शिंत्रे , याप्रमाणे शनिमांडळचे सरपंच योगेश मोरे , सयाजीराव मोरे , मा.जि.प.सदस्य मुन्ना पाटील भाऊसाहेब पाटील या स्थानिक नेत्यांनी पर्यावरण मंत्री मा.ना. आदित्य ठाकरे व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मुंबईत भेट घेत त्यांच्या सोबत जलजीवन मिशन अंतर्गत या गावाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा अनुषंगाने मागच्या आठवडयात बैठक घेत निवेदन दिले होते . याचीच दखल घेत या दोन्ही नेत्यांनी नंदुरबार तालुक्यातील रनाळे आणि शनिमांडळ या गावांना जल जीवन मिशन अंतर्गत मंजुरी देत त्यांचा कामांना प्रशासकीय मान्यता देखील दिली आहे . शनिमांडळ गावासाठी 6 कोटी 81 लक्ष 76 तर रनाळे गावासाठी 11 कोटी 29 लक्ष 02 हजार रुपयांच्या निधीला मान्यता दिल्या गेली आहे . विशेष म्हणजे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री मा.ना. गुलाबराव पाटील यांनी या ग्रामस्थांना गुरुवार रोजी मंत्रालयात बोलावुन प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय ग्रामस्थांना देवुन दर्जेदार कामाच्या सुचना केल्या आहेत . केल्या आहेत . याच प्रमाणे जिल्हयातील शिवसेना नेत्यांनी प्रकाशा येथील पाणी पुरवठायोजनेचा देखील पाठ पुरावा केला होता . त्यामुळे प्रकाशा गावच्या पाणी पुरवठा योजनेला देखील 5 कोटी 65 लक्ष 26 हजारांचा प्रशासकीय मान्यातेला मंजुरी देण्यात आली आहे . नंदुरबार जिल्हयातील अनेक गावांतील पाणी समस्या पाहता शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असलेल्या या खात्याच्या माध्यमातुन जलजीवन मिशन अंतर्गत अनेक गावातील पाण्याच्या समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे , जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी , शिवसेना नेते मा.आ . चंद्रकांत रघुवंशी , जि. प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, जि.प. सभापती कृषी व पशुसंवर्धन गणेश पराडके प्रयत्नशील असुन यापुढे देखील जल जीवन मिशन मधुन आदिवासी बहुल नंदुरबार जिल्हयातील पाण्याचा प्रश्नासाठी शिवसेना सदैव तत्पर असणार आहे . दरम्यान या तीन्ही गावच्या पाण्याच्या प्रश्नी मंत्री मा.ना. आदित्य ठाकरे व मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या प्रशासकीय मान्यते बाबत सर्व शिवेसना पदाधिकारी आणि ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे .