तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील आमलाड येथे विद्या गौरव प्रायमरी व गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कुल,गौरव कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व त्रिमूर्ती महिला महाविद्यालय 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य विश्वास पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक हर्षवर्धन तांबोळी, ललित पाठक व प्रभारी प्राचार्य आरजु पिंजारी हे होते.ध्वज स्तंभाचे व भारत मातेचे पूजन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले.ध्वजारोहण ललित पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्तविक व सूत्रसंचालन शिक्षिका प्रीती बुनकर यांनी केले.यावेळी प्रभारी प्राचार्य आरजु पिंजारी,प्रा.प्रेमसिंग वसावे यांनी प्रजासत्ताक दिनाबाबत माहिती दिली. कार्यक्रमात क्रीडा शिक्षक पुलायन जाधव,तुषार शिंपी,श्रावण सूर्यवंशी,निलेश धोडरे,दशरथ वसावे,प्रा चेतना माळी,प्रा.रामेश्वरी बत्तीसे,भाग्यश्री अग्निहोत्री,रंजना नाईक,अश्वनी माळी,श्रुती गांधी,मनीषा बिरारे,विलास शिरसाठ हे उपस्थित होते.तर शेवटी आभार तुषार शिंपी यांनी मानले.








