नंदुरबार l प्रतिनिधी
एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नंदूरबार आगारात प्रजासत्तादिनी कर्मचाऱ्यांनी भीकमांगो आंदोलन केले.या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने भिक द्यावी अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
नंदुरबार मुख्य आगारात एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी भीक मांगो आंदोलनाची दखल आपल्या प्रकृतीतून तंदुरुस्त झालेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेऊन आम्हालाही भीक घालावी अशी अपेक्षा आंदोलन करत या एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात सुरू असलेल्या एसटी संपात नंदुरबार जिल्ह्यातूनही चार आगारातून एसटी कर्मचारी गेल्या नव्वद दिवसापासून संपात सहभागी आहे, त्यामुळे गेल्या तीन महिन्यांचे वेतन रखडल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न कर्मचाऱ्यांचा समोर पडला आहे.
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी गेल्या 90 दिवसांपासून संप करीत आहेत. या संपामुळे कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचे वेतन मिळाले नाही. त्यासोबतच या संपामुळे महामंडळाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त नंदुरबार आगारात एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने भीक मांगो आंदोलन करून राज्य शासनाला जाग यावी व आम्हालाही भीक घालावी अशी मागणी केली आहे.