नंदुरबार l प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण करून जगातील एकमेव मजबूत लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. युवक आणि नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता राष्ट्रसेवेच्या भावनेने मतदान करावे आणि मतदार जागृतीच्या कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले.
तहसिल कार्यालय नवापूर यांनी आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ,नायब तहसिलदार अरविंद गावीत,सिनिअर कॉलेज नवापूर चे प्राध्यापिका छाया गावीत आदी उपस्थित होते.तहसीलदार कुलकर्णी म्हणाले की “राष्ट्रीय मतदार दिवस” म्हणजे लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत नवीन मतदार नोंदणी करून कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता जागृत नागरिक होऊन मतदान करणे होय. त्यामुळे नव युवकांनी मतदार जनजागृतीसाठी स्वत: व इतर नागरिकांना प्रोत्साहित करुन मतदार नोंदणी व मतदानाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करावा. नागरिकांनीही मतदानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन लोकशाही अधिक बळकट करावी. तसेच मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांनी देखील जास्तीत जास्त प्रमाणात मतदार नोंदणीसाठी जनजागृती करावी.व उज्वल भविष्य घडविण्याची खुप मोठी जबाबदारी पार पाडावी यावेळी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धांमध्ये विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सर्वप्रथम “राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त” मतदार जागृतीची शपथ घेण्यात आली. प्रास्ताविकात नायब तहसीलदार अरविंद गावीत म्हणाले की, मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा, मतदारांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी २५ जानेवारी रोजी देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मतदारांना विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, तसेच राष्ट्रीय मतदार दिवस आयोजनाबाबत माहिती दिली.
त्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO
पी.बी.वळवी (नवागाव), ज्ञानेश्वर खुशाल पाटील (सुकवेल), विक्रम बापू गावीत (तारापूर), हिमांशू रमेश बोरसे (बोरचक पश्चिम), दशरथ गोरख पाटील (पिंपळोद), रवींद्र रतीलाल पाटील (पिंपळोद),ज्योत्स्ना भाईदास पवार (धुळवद), प्रकाश सोनू वाणी (बिलाडी), गणेश अशोक वाळुंज (खातगाव), गोकुळ शंकर पवार (नानगीपाडा), दिनेश मोतीराम चव्हाण (वावडी), जागृती सुरेश पाटील (कोठडा),अकलाख रफिक मिर्झा (नवापूर), शालीम वारश्या गावीत (रायपूर), संदीप भंगा नायका (विसरवाडी), फिलिप वंजी मावची (सरी), अनिष विजय गावीत (धनबर्डी), भागवत माणिक धनगर (अंबापूर), विशाल दिलीप पाटील ( अजेपुर), भगवान सूर्यभान व्यवहारे (ठानेपाडा) यांचा मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर कार्यक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO) यांच्यातून अंबापूर शाळेचे शिक्षक भागवत धनगर व दिनेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गेडाम यांनी केले तर आभार प्रदर्शन अजेपुर येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी विशाल पाटील यांनी केले.कार्यक्रमात विशेष सहकार्य तहसिल नवापूर चे तंत्रसहायक विलास गावीत व आदी कर्मचारी यांनी केले.