धडगाव l प्रतिनिधी
धडगांव- वडफळ्या रोषमाळ बु.नगरपंचायत निवडणूक निकालात शिवसेनेने एकूण १७ पैकी १३ जागांवर निर्विवाद वर्चस्व स्थापन करीत एकहाती विजय मिळविला. यामुळे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बु. नगरपंचायत ताब्यात घेऊन प्रथमच फडकला. शिवसेनेचा या भगवा अविस्मरणीय विजयाचे औचित्य साधून धुळे- नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी धडगांव तालुक्याचे नेतृत्व तथा जि.प. सदस्य विजय पराडके, जि.प.कृषी सभापती गणेश पराड- के व जि.प. सदस्य रविंद्र पराडके यांचा शाल देऊन सत्कार केला. तसेच नवनिर्वाचित नगरसेवक भरतसिंग पराडके, रघुनाथ पावरा, राजू पावरा, सरदार पावरा, विजय ब्राम्हणे, इंजि. भावना चव्हाण, कविता पावरा, डॉ. दीपिका पर डके, धनसिंग पावरा, पुरुषोत्तम पावरा, सुनंदाबाई पावरा, विद्या वळवी, शर्मिला पराडके, सपना पराडके, युवानेते मुकेश पराडके, फत्तेसिंग पावरा व तालुकाप्रमुख महेशकुमार पाडवी यांचा शाल देवून सत्कार करण्यात आला. दरम्यान, सदर निवडणुकीत शर्थीने निवडणूक लढविणाऱ्या युवासेनेचे योगेश पाटील व युवराज खर्डे या दोन्ही युवा उमेदवारांचे कौतुक केले. यावेळी शहरप्रमुख मिनेश चव्हाण, उपतालुका प्रमुख दिलीप पाडवी, सरदार शेठ, हेमंत पावरा, सेगा पावरा, शिवा वळवी, दिलवरसिंग पावरा, राकेश डुडवे, शहर युवाधिकारी बंटी सोनवणे, शरीफ पिंजारी, रिजवान बेलदार, आमशा पावरा, अशोक वसावे, ललित जगदाळे, अमोल पराड के, अमन पराडके व शिवसैनिक उपस्थित होते.