नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील विविध मागण्यासाठी निवेदन देऊनही प्रशासनाने कुठलीही उपाययोजना न केल्याने पालिका प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांना जागे करण्यासाठी भाजपातर्फे प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.विविध पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष भरत माणिकरावजी गावीत यांनी केले आहे.
दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी ९ वाजता नवापूर नगर पालिका हद्दीतील राष्ट्रीय महामार्गत बाधित होणाऱ्या 69 कुटूंबियांना पर्यायी जागा मिळणे व उपजिल्हा रुग्णालय समोर D P रोड ला जोडून राष्ट्रीय महामार्गावर भुयारी मार्ग करणे तसेच इस्लामपुरा व दिगंबर पाडवी सोसायटीला जोडण्यासाठी भुयारी मार्ग करण्या बाबत वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासन कुंभकर्णी निद्रेतुन उठायला तयार नाही.म्हणून या समस्येचा निराकरण व्हावे म्हणून नगर पालिका प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांना जागे करण्यासाठी भाजपातर्फे धरणे आंदोलन होणार आहे.या जनहिताच्या कामासाठी होणाऱ्या आंदोलनात नवापूर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी,प्रदेश सदस्य,आजी-माजी जिल्हा पदाधिकारी,नगरसेवक, युवा मोर्चा , पदाधिकारी,शहर पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष भरत माणिकरावजी गावीत, शहराध्यक्ष प्रणव सोनार यांनी केले आहे.