Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पत्रकाराला मारहाण केल्याचा निषेध करीत राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघामार्फत तहसीलदार यांना निवेदन सादर

team by team
January 24, 2022
in क्राईम
0
पत्रकाराला मारहाण केल्याचा निषेध करीत राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघामार्फत तहसीलदार यांना निवेदन सादर

म्हसावद l प्रतिनिधी
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ नागपूर जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार सतीश भालेराव यांना हिंगणा शहराचे वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी केलेल्या मारहाणी बाबत शहादा तालुक्यातील राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघामार्फत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हंटले होते की, राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे नागपुर जिल्हाध्यक्ष सतीश भालेराव यांना हिंगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम परदेशी यांनी जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील पुसद येथील धाडसी पत्रकार संदेश कानू व पत्रकार सय्यद फैजान यांच्यावर तीस ते चाळीस गाव गुंडांनी प्राणघातक हल्ला केला व पत्रकारांच्या जवळील वृत्तांकन करण्यासाठीचे अंदाजे ८० हजार रुपयांचे साहित्य लुटून नेले. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेवर हा हल्ला असून याबाबत पत्रकार संरक्षण अधिनियम २०१७ सुधारणा २०१९ तात्काळ कारवाई करण्यात यावी. व पीडित पत्रकारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. राज्यात निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर अवैध व्यवसायिक वाळू माफिया व इतर बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्तीकडून अथवा त्यांच्या गुंडाकडून हल्ले केले जातात अथवा पत्रकारांना खोट्या गुन्हांमध्ये अडकवून विनाकारण त्रास दिला जातो यात अनेकवेळा भ्रष्ट अधिकारी व भ्रष्ट लोकप्रतिनिधी देखील सामील होतात अशावेळी पत्रकार अधिनियम 2019 द्वारे संबधीत गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी. ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृतीधारक पत्रकार म्हणून लाभ मिळावा यासाठी किचकट निकषांमध्ये बदल करण्यात यावे व नियम शिथिल करावे. तसेच अधिस्वीकृतीधारक बाबतचे अधिकार त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकारी यांना देण्यात यावे. युट्यूब न्यूज चैनलची अधिकृत नोंदणी करून त्यांना पत्रकारिता क्षेत्रात सामावून घेण्यात यावे. राज्यातील पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा मिळावा, राज्यातील सर्व शासकीय इमारतीमध्ये स्वतंत्र पत्रकार कक्ष स्थापन करावे. राज्यातील शासकीय विश्रामगृहाचा पत्रकारांना निशुक्ल प्रवेश देण्यात यावा. राज्यातील प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात पत्रकारांसाठी स्वतंत्र शासकीय विश्रामगृह उभारावे. पत्रकार प्रवास करत असलेल्या वाहनांना टोल माफी मिळावी व केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात यावा. रेल्वे मध्ये पत्रकारांना मोफत प्रवेश देण्यात यावा. प्रत्येक तालुक्यात पत्रकार वसाहती निर्माण करून पत्रकारांना हक्काचे घर देण्यात यावे. वयोवृध्द पत्रकारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शन योजना लागू करावी. पत्रकारांना शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विमा प्रमाणे मोफत कायमस्वरूपी आरोग्य विमा मिळवा. शासकीय नोकऱ्यामध्ये पत्रकारांच्या कुटुंबातील व्यक्तिंना प्राधान्य देण्यात यावे. शैक्षणिक प्रवेशमध्ये पत्रकारांच्या कुटुंबियांना प्राधान्य मिळावे. श्रमिक पत्रकार ज्यांचे पत्रकारितेच्या उत्पन्नावर उदरनिर्वाह अवलंबून आहे अशा पत्रकारांना शासकीय योजनांमध्ये प्रामुख्याने लाभ मिळून देण्यात यावा. २१- २०२२ मध्ये कोरोनाच्या काळात मृत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून द्यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सर्व पत्रकारांना शासनाच्या वतीने सन्मानित करण्यात यावे. अशासकीय समित्या, पोलीस दक्षता समिती, शांतता समिती, आरोग्य समिती, शालेय व्यवस्थापन समिती महामंडळ व शासनाच्या नियंत्रणाखाली असलेले ट्रस्ट यामध्ये पत्रकारांना प्राधान्याने नियुक्ती करण्यात यावी. शासनाच्या वतीने राज्य राज्यस्तरीय पुरस्कार दिली जातात त्याच धर्तीवर जिल्ह्यातील पत्रकारांना जिल्हास्तरीय
पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. शासनाने वय ६० पुर्ण झाल्यावर सर्व निकष तपासुन ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्विकृती दिली होती व आता सन्मान चा लाभ देताना जाचक अटी टाकून ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानच्या लाभा पासुन दुर ठेवले जात आहे हे अन्यायकारक आहे. याबाबत शासनाने लक्ष घालावे तसेच ज्येष्ठ पत्रकारांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा. अश्या मागण्यासह तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्ध्वजी ठाकरे यांना सुपूर्त करण्यात आले.
यावेळी कोमलसिंग गिरासे, गिरीधर मोरे, पुलायन जाधव, आर.डी. गिरासे, घनश्याम पाठक, शैलेश पाटील, यशवंत कलाल, काशीनाथ सोनार, साहेबराव बिरारी, प्रकाश भाई, संगीता पाठक, कल्पना पांड्या आदींसह पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Next Post

हवामान विभागाच्या अंदाजानुसार दि.२५ रोजी जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता

Next Post
हवामान विभागाच्या अंदाजानुसार  दि.२५ रोजी जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार दि.२५ रोजी जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add