म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथील सन्मित्र बहुउद्देशीय क्रीडा मंडळातर्फे थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानी कुलकर्णी यांनी दोघांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
नेताजी बोस यांनी देश स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचा गौरव करण्यात आला. मराठी माणसां च्या हक्का साठी बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या कार्याचाही ज्ञानी कुलकर्णी यांनी याप्रसंगी गौरव केला. याप्रसंगी श्रीकृष्ण सोनार, समीर जैन, आदि संचालक उपस्थित होते. उपस्थित संचालकांनी,सभासदांनी देखील पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.