अक्कलकुवा l प्रतिनिधी
शिवसेना प्रमुख हिन्दूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंती निमित्ताने अक्कलकुवा येथील शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात प्रतिमा पूजन तसेच अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी शिवसेना नंदुरबार जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांचा हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी , जिल्हा संघटक लक्ष्मण वडिले तसेच युवती सेनेच्या मालती वळवी यांनी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. यावेळी महिला सेना जिल्हा प्रमुख रीना पाडवी, जिल्हा प्रसिद्धि प्रमुख नवरतन टाक, युवासेना जिल्हा प्रमुख ललित जाट, तालुका प्रमुख जयप्रकाश परदेशी, जेष्ठ नेते किरसिंग वसावे, सुरेश वसावे, जी.डी.पाडवी, पृथ्वीसिंग पाडवी, किसन महाराज,कथ्थु सैंदाणे, युवासेना जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी, किशोर ठाकुर, नटवर पाडवी, उपशहर प्रमुख जितेंद्र लोहार, युवती सेना जिल्हा प्रमुख मालती वळवी, संगीता पंजराळे, महावीर डागा, आशीष जैन, संतोष पवार,जसराज पवार, नासिर बलोच, दीपक मराठे, गोलू चंदेल, पार्थ लोहार आदि शिवसैनिक उपस्थित होते.