Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात १ ली ते ४ थी चे वर्ग बंदच राहणार, २४ जानेवारी पासुन ५ वी ते १२ वी च्या शाळा होणार: जिल्हाधिकारी मनिषा खत्री

team by team
January 23, 2022
in शैक्षणिक
0
अखेर सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यात दि.२४ जानेवारी २०२२ पासुन इयत्ता ५ वी ते १२ वी चे वर्ग असलेल्या शाळा सुरु करण्यात येणार असुन इयत्ता १ ली ते ४ थी चे वर्ग तुर्तास सुरु करण्यात येऊ नये.याबाबतचे परिपत्रक जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी आज काढले आहे.
या परिपत्रकात म्हटले आहे की, दि.२४ जानेवारी २०२२ पासुन शाळा सुरु करणे संदर्भात शासननिर्देश प्राप्त आहेत .त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग अंतर्गत असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी आदेश दिले आहेत.दि २४ जानेवारी २०२२ सोमवार पासून नंदुरबार जिल्ह्यातील इयत्ता ५ वी ते १२ वी चे वर्ग असलेल्या शाळा सुरु करण्यात याव्यात . तसेच जे विद्यार्थी शाळांमध्ये येत नसतील अशा विद्यार्थ्यांना ऑन – लाईन / ऑफ लाईन अध्यापनाच्या संदर्भात उचित कार्यवाही करावी . शाळेची वेळ विद्यार्थ्यांसाठी सकाळी ११ ते दुपारी ३अशी असेल तर शिक्षकांनी शाळेत पूर्ण वेळ उपस्थित रहावे . ज्या मोठ्या गावांमध्ये व नगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी पालकांची संमती घेऊन शाळा सुरु करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी . शाळांमध्ये कोरोना बाधित शिक्षक अथवा विद्यार्थी आढळून आल्यास सदर शाळा ५ दिवस बंद ठेवावी . उपरोक्त संदर्भ क्रमांक च्या शासन परिपत्रकास संलग्न केलेले परिशिष्ट अ व परिशिष्ट – ब बाबत काटेकोर पणे अंमलबजावणी व कार्यवाही करण्यात यावी . तसेच इयत्ता १ ली ते ४ थी चे वर्ग तुर्तास सुरु करण्यात येऊ नये . याबाबत यथावकाश निर्देश देण्यात येतील . मात्र या वर्गाना अध्यापन करणार्‍या शिक्षकांनी शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहुन ऑनलाईन / ऑफलाईन अध्यापनाची उचित कार्यवाही करावी . शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षकीय यंत्रणेने नियोजन करुन शालेय कामकाज कोव्हीड -१९ च्या निर्देशाप्रमाणे सुरळीत सुरु राहील याबाबत दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी आज दिले.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात ७२ तासात आढळले १ हजार २३३ कोरोना रूग्ण

Next Post

खोंडामळी ग्रामपंचायततर्फे गावातील 31 दिव्यांग लाभार्थीना पाच टक्के निधीचे वाटप

Next Post
खोंडामळी ग्रामपंचायततर्फे गावातील  31 दिव्यांग लाभार्थीना पाच टक्के निधीचे वाटप

खोंडामळी ग्रामपंचायततर्फे गावातील 31 दिव्यांग लाभार्थीना पाच टक्के निधीचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add