Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा तालुक्यात सिलबंद केलेल्या साडेबारा लाखाचा अवैध बायोडिझेल परस्पर विक्रीकरून टाक्यांमध्ये भरले पाणी सात जणांविरूध्द अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

team by team
January 22, 2022
in क्राईम
0
अक्कलकुवा तालुक्यात सिलबंद केलेल्या साडेबारा लाखाचा अवैध बायोडिझेल परस्पर विक्रीकरून टाक्यांमध्ये भरले पाणी सात जणांविरूध्द अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नंदुरबार| प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यात बायोडिझेल सारखा पदार्थ विक्री करण्याचा उद्देशाने ठेवला असता महसूल विभागाने सीलबंद केला.असे असतांनाही १२ लाख ६४ हजाराचा अवैध बायोडिझेल परस्पर विक्री करून टाक्यांमध्ये पाणी भरल्याप्रकरणी केल्याप्रकरणी सात जणांविरूध्द अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील उदेपूर गावाच्या शिवारातील ४४/१ येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुनिल छबीदास सुर्यवंशी यांनी बायोडिझेल तत्सम पदार्थ सुरक्षितेचे काळजी न घेता मानवी जीवीतास हानी पोहोचण्याची शक्यता असतांनाही बायोडिझेल साठवणूक करून विक्री करण्याचे धाडस केले होते. याबाबत सदर मालमत्ता दोन पंचासमक्ष सील करून सुनिल सुर्यवंशी यांच्या ताब्यात देण्यात आली होती. सील असतांनाही १० लाख ४० हजाराचे १३ हजार लिटर अवैध बायोडिझेल परस्पर विक्री केले. तसेच चार टाक्यांपैकी दोन टाक्या बायोडिझेल सदृश्य व पाणी भरल्याचे आढळून आले म्हणून पुरवठा निरीक्षक गुलाब राजाराम बागले यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात सुनिल छबीलदास सुर्यवंशी, अल्पेशभाई मवानी पटेल रा.सुरत (गुजरात), भिमसिंग माकत्या वसावे रा.मोठे उदेपूर (ता.अक्कलकुवा) यांच्या विरूध्द भादंवि कलम ४०६, १८८, २८५, ३४ सह जिवनावश्यक वस्तु अधी क. ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई रमेश पाटील करीत आहेत. तर दुसर्‍या घटनेत कृष्णा राजाराम चौधरी यांनी बायोडिझेलची मालमत्ता सील असतांनाही २ हजार ८०० लिटर अवैध बायोडिझेल परस्पर विक्री करून टाक्यामध्ये बायोडिझेल सदृश्य व पाणी भरल्याचे आढळून आले म्हणून पुरवठा निरीक्षक गुलाब राजाराम बागले यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात कृष्णा राजाराम चौधरी रा.खापर (ता.अक्कलकुवा), राजपुरोहित मदतनसिंग रा. वाकल (जि.सुरत), किरण हरी चौधरी, रमेश मोत्या वसावे रा.खापर (ता.अक्कलकुवा) यांच्याविरूध्द भादंवि कलम ४०६, १८८, २८५, ३४ सह जिवनावश्यक वस्तु अधी क. ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास पोसई निलेश राऊत करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

विश्व अहिराणी संमेलनात साक्री तालुक्यातील डॉ.सर्जेराव भामरे व सौ. वृषाली खैरनार यांचा समावेश

Next Post

सेंट्रल किचनने पुरवला आश्रमशाळेतील ११ हजार विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार, नंदूरबारच्या अनोख्या संकल्पनेची नीती आयोगाकडुन विशेष दखल

Next Post
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील ढाबा व हॉटेल्सवर छापा टाकत बायोडिझेलच्या साठवणूकीसाठी भूमिगत टाक्या पथकाने जेसीबीने केल्या नष्ट

सेंट्रल किचनने पुरवला आश्रमशाळेतील ११ हजार विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार, नंदूरबारच्या अनोख्या संकल्पनेची नीती आयोगाकडुन विशेष दखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add