तळोदा | प्रतिनिधी
अक्कलकुवा रस्त्यावरील चुनीलाल माळी यांच्या शेतात गाईच्या गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत २ वासरू जळून खाक झाले असून एक गाय ५० टक्यापेक्षा जास्त जळाली आहे. शिवाय २ लाख ७५ हजाराचे शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे.
अक्कलकुवा रस्त्यावरील शेत शिवारातील चुनिलाल वंजी माळी यांच्या शेतातील गाईच्या गोठ्याला दि.१६ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे या आगीत दोन वासरू जळून खाक झाले असून एक गाय ५० टक्क्यांपेक्षा अधिक जळाली असून मृत्यूशी झुंज देत आहे. या शिवाय या आगीत एक लाकडी बैलगाडी, एक चारा कुट्टी मशिन, दोन टन सुका चारा, गायीचा गोठा, शेतीचे औजारे, लोखंडी पत्रे जळून खाक झाले आहे.
याबाबत अग्निशमन वाहिनीचे वाहन चालक यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून तातडीने पालिका प्रशासनाचे अग्निशमन वाहन त्याठिकाणी प्रचारण करण्यात आले. या अग्नीवर ताबा मिळवण्यात त्यांना यश आला. दरम्यान तळोदा तलाठी चाटे यांनी कर्मचाऱ्यासोबत जाऊन रविंद रामदास मगरे, शैलेंद्र सूर्यवंशी, राजकपूर मगरे, राजेंद्र मगरे यांच्या उपस्थितीत गोठ्याचे मालक चुनीलाल वंजी माळी यांच्या गोठ्याच्या पंचनामा केला.
या आगीत गायीचे मादी वासरू रक्कम ५०००, नर वासरू ७०००, लाकडी बैल गाडी रक्कम २००००, चारा कुटण्याचे मशीन १८०००, २ टन सुका चारा रक्कम २००००, शेड जळून खाक त्यात दरवाजे, लाकडी दांड्या, आदी रक्कम ७००००, नांगर वखर, पांम्बर, रेझर यासह शेती अवजारे रक्कम २५०००, लोखंडी पत्रे १०० नग जळून खाक रक्कम ७००००, मोठी गाय ४० टक्के जळून मृत अवस्थेत रक्कम ४००००, असे एकूण २ लाख ७ हजार रु.रक्कमेचे नुकसान झाले आहे.