नंदुरबार l प्रतिनिधी
अंकलेश्वर बऱ्हाणपूर – महामार्गावरील कौली गाव शिवारात अवैधरित्या बायोडिझेल पदार्थ विक्रीप्रकरणी दोघांविरूद्ध अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील 1 कौली गावाच्या शिवारात सर्व्हे क्र. १७/१/अ या ठिकाणी ईश्वर केसाराम चौधरी व गुलाबचंद लादुराम शर्मा दोघे रा. खापर ता. अक्कलकुवा यांनी बायोडिझेल तत्सम पदार्थ कोणतीही सुरक्षिततेची काळजी न घेता मानवी जिवीतास धोका पोहचण्याची शक्यता असल्याची माहिती असतांना देखील साठवणूक करुन विक्री करण्याचे धाडस केले. याबाबत अक्कलकुवा तहसील कार्यालयातील प्रभारी पुरवठा निरीक्षक गुलाब राजाराम बागले यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध भादंवि कलम १८८, २८५ सह जिवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांकडून ४७ हजार रुपये किंमतीच्या दोन रिकाम्या लोखंडी टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गावित करीत आहेत.