Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उपसासिंचन योजनांसाठी ११५ कोटींचा शासन आदेश जारी, मंत्री जयंतराव म्हणाले, ‘संदीप तुझ्या प्रयत्नांना यश आले

team by team
January 21, 2022
in कृषी
0
उपसासिंचन योजनांसाठी ११५ कोटींचा शासन आदेश जारी, मंत्री जयंतराव म्हणाले, ‘संदीप तुझ्या प्रयत्नांना यश आले

नंदुरबार | प्रतिनिधी
धुळे जिल्हयातील ८ व नंदुरबार जिल्हयातील १४ अशा २२ राज्यस्तर सहकारी उपसा सिंचन योजनांच्या विशेष दुरूस्ती कामांच्या ११५ कोटी रूपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा आज शासनआदेश निघाला. स्वतः जलसंपदामंत्री
जयंतराव पाटील यांनी हा आदेश राष्ट्रवादीचे नेते संदीप बेडसे यांच्या हाती सोपवित आणि लाडू भरवित तुझ्या पाठपुराव्याला यश आल्याची शाबासकी दिली.
राष्ट्रवादीचे धुळे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष संदीप बेडसे यांनी या उपसा सिंचन योजनांच्या ११५ कोटींच्या सुधारीत प्रस्तावास मान्यता मिळावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यापुर्वीच नियोजन व वित्त विभागाकडून त्यास हिरवा कंदील मिळाला होता. आज याबाबतचा शासन आदेश जारी झाला. यावेळी स्वतःजलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या आदेशाची प्रत श्री. बेडसे यांच्याकडे सोपविली. शिवाय लाडु भरवून आनंदही व्यक्त केला. यावेळी
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस अविनाश आदीक, शिवाजीराव गर्जे,युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण ,संजय खोडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सन २००७-२००८ मध्ये तापी नदीवरील प्रकाशा (६२.११ दलघमी) व सांरगखेडा
(९१.८१ दलघमी) या बॅरेजेसच्या माध्यमातून १५३ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यातून साधारण १८ दलघमी पाण्याचा वापर होत असून उर्वरित १३५ दलघमी पाणी विना वापर राहिल्याने वाया जाते. भौगोलिक परिस्थितीमुळे उपसा
सिंचन योजने शिवाय पाणी शेतीपर्यंत पोहचणे शक्य नव्हते. सन २०१९ ला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सदरील २२
उपसा सिंचन योजना शासनामार्फत दुरूस्त करून पुनर्कार्यान्वित करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे संदीप बेडसे यांनी पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू केला होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. २२ उपसा सिंचन योजनेत नंदुरबार जिल्हयातील १४ व धुळे जिल्हयातील शिंदखेडा तालुक्यातील ८ योजनांचा समावेश आहे.नंदुरबार जिल्हयातील १४ उपसा सिंचन
योजनांमुळे एकूण ९ हजार १९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तर शिंदखेडा तालुक्यातील ८ उपसा सिंचन योजनेच्या कामामुळे साधारण २२ गावांमधील ३ हजार १५७ शेतकर्‍यांचे ५ हजार २२३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून पाणी जवळ असून सुध्दा पाण्यापासून वंचित असलेल्या बळीराजाचे जिवनमान उंचावल्यास नक्कीच मदत होणार असल्याचेही श्री. बेडसे यांनी म्हटले आहे.
यावेळी श्री. बेडसे यांच्यासोबत माजी आ. रामकृष्ण पाटील, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे,रणजित राजे भोसले,ज्योती पावरा,सत्यजीत सिसोदे,मयुर बोरसे यांचीही उपस्थिती होती.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यात दि. २२ जानेवारी रोजी अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता, शेतकर्‍यांनी जनावरांचे थंडीपासून संरक्षण करण्याचे कृषि विज्ञान केंद्राचे आवाहन

Next Post

सावऱ्या दिगरचा गाळात रुतला विकास, दळण-वळणासाठी नदीतून जिवघेणा प्रवास

Next Post
सावऱ्या दिगरचा गाळात रुतला विकास, दळण-वळणासाठी नदीतून जिवघेणा प्रवास

सावऱ्या दिगरचा गाळात रुतला विकास, दळण-वळणासाठी नदीतून जिवघेणा प्रवास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add